जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या पूजेत हा धन्वंतरी स्तोत्र अवश्य वाचा, वर्षभर धन-धान्य-पैसा कमी नाही पडत

Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या पूजेत हा धन्वंतरी स्तोत्र अवश्य वाचा, वर्षभर धन-धान्य-पैसा कमी नाही पडत

Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या पूजेत हा धन्वंतरी स्तोत्र अवश्य वाचा, वर्षभर धन-धान्य-पैसा कमी नाही पडत

धनत्रयोदशीला धन्वंतरी स्तोत्राचे खूप महत्त्व आहे. धन्वंतरी स्तोत्राच्या जपाने देवी लक्ष्मी तर प्रसन्न होतेच पण तिच्या कृपेमुळे वर्षभर कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अधिक माहिती पाहुया.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर : दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीने होते. यावर्षी धनत्रयोदशी 22 ऑक्टोबरला शनिवारी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेराची विशेष पूजा केली जाते. असे म्हणतात की धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू खूप शुभ ठरतात. धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या नाण्यांची खरेदी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. पण याशिवाय धनत्रयोदशीचे असे उपायही शास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊ शकते. धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते. त्यांच्या कृपेने धनासोबत चांगले आरोग्यही प्राप्त होते. धन्वंतरी स्तोत्राचा जप - पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, धनत्रयोदशीला धन्वंतरी स्तोत्राचे खूप महत्त्व आहे. धन्वंतरी स्तोत्राच्या जपाने देवी लक्ष्मी तर प्रसन्न होतेच पण तिच्या कृपेमुळे वर्षभर कधीही पैशाची कमतरता भासत नाही. भगवान धन्वंतरीचा जन्म धनत्रयोदशीला झाला. असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या रात्री जो कोणी भगवान धन्वंतरीची पूजा करतो त्याच्या घरात धनाची कमतरता नसते. धनत्रयोदशीला धन्वंतरी स्तोत्राचा जप केल्याने घर धन-धान्याने भरते. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते आणि घराची तिजोरी नेहमी भरलेली असते. धन्वंतरी स्तोत्र - ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः। सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥ कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम। वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम॥ ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये: अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्री धनवंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥

News18लोकमत
News18लोकमत

याप्रमाणे धन्वंतरी स्तोत्राचा जप करा - ज्योतिषांच्या मते, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी उत्तर दिशेला पूजेसाठी एक पाठ/चौरंग स्थापन करा. कुबेर, धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती चौरंगावर स्थापित करा. भगवान कुबेरांना पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरीला पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा. यानंतर गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून आरती करावी. त्यानंतर धन्वंतरी स्तोत्राचे पठण सुरू करा. शेवटी सर्व देवतांचा आशीर्वाद घ्या आणि सुख-समृद्धीची कामना करा. हे वाचा -   दिवा विझणं खरंच अपशकुन आहे का? पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्या

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात