मुंबई, 28 जून : हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार एकूण 24 एकादशी आहेत, त्यापैकी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीपासून चार महिने भगवान विष्णू योगनिद्रेत राहतात. उद्या देवशयनी एकादशी आहे. यावेळी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेसाठी वारकरी गर्दी करतात. पंढरीचा पांडुरंग हा विष्णूचेच रुप मानला जातो. आषाढी वारीतील पालख्या-दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. देवशयनी एकादशीची उपासना पद्धत आणि शुभ मुहूर्त काय आहे त्याविषयी जाणून घेऊ. आषाढी/देवशयनी एकादशीचा शुभ मुहूर्त - हिंदू कॅलेंडरनुसार, आषाढ शुक्ल एकादशी आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी 29 जून रोजी पहाटे 3:18 वाजता सुरू होईल आणि 30 जून रोजी दुपारी 2:42 वाजता समाप्त होईल. पण, उदयतिथी 29 जून रोजी येत असल्यानं हे व्रत 29 जून रोजी पाळले जाणार आहे. स्वाती नक्षत्र, सुस्थिरा आणि विशाखा नक्षत्र गुरुवारी वर्धमान नावाचा शुभ योग तयार करत आहेत. यासोबतच शिव आणि साध्य नावाचे आणखी दोन शुभ योगही या दिवशी तयार होतील. त्यामुळे यंदाच्या देवशयनी एकादशीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
देवशयनी एकादशी पूजेचा शुभ मुहूर्त विजय मुहूर्त - दुपारी 02:44 ते 03:40 पर्यंत अभिजीत मुहूर्त - सकाळी 11:57 ते दुपारी 12:52 पर्यंत दुपारी 12:25 ते 02:09 पर्यंत दुपारी 02:09 ते 03:54 संध्याकाळी 05:38 ते 07:23 Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी वाचावी ही कथा; पांडुरंगाच्या कृपेने संकटे होतील दूर देवशयनी एकादशीची व्रतपूजा पद्धत - गुरुवार, 29 जून रोजी पहाटे उठून स्नान करून उपवास व उपासनेचा संकल्प करावा, ज्या प्रकारचा उपवास करायचा आहे, त्यानुसार संकल्प करावा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर विष्णूसह लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र पाटावर किंवा चौरंगावर स्थापित करा. सर्वप्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावून मूर्तींना टिळा लावावा. भगवान विष्णूला पिवळे वस्त्र आणि देवी लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण करा. यानंतर अबीर, गुलाल, तांदूळ, फुले, रोळी आदी वस्तू देवाला अर्पण करा. प्रसाद अर्पण केल्यानंतर आरती करावी आणि प्रसाद वाटपानंतर देवशयनी एकादशीची कथा ऐकावी. सायंकाळी सात्विक आहार घेऊन भजन कीर्तन करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 30 जून शुक्रवारी ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि मग उपवास सोडावा. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







