जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी वाचावी ही कथा; पांडुरंगाच्या कृपेने संकटे होतील दूर

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी वाचावी ही कथा; पांडुरंगाच्या कृपेने संकटे होतील दूर

आषाढी एकादशी कथा 2023

आषाढी एकादशी कथा 2023

Ashadhi Ekadashi 2023: एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना आषाढ शुक्ल एकादशीच्या व्रताची पद्धत आणि महत्त्व विचारले होते. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की,…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 जून : यंदाची देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी 29 जून गुरुवारी आहे. या दिवशी पंढरीच्या विठ्ठलाची, भगवान विष्णूची पूजा करावी आणि व्रत करावे. या एकादशीला व्रत केल्यानं पापे नष्ट होऊन स्वर्गप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना आषाढ शुक्ल एकादशीच्या व्रताची पद्धत आणि महत्त्व विचारले होते. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, नारदजींनी ब्रह्मदेवांनाही या व्रताबद्दल विचारले होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, हे व्रत सर्व एकादशींमध्ये महत्त्वाचे मानले जाते. कारण हे व्रत केल्याने कलियुगात राहणार्‍या जीवांना स्वर्ग प्राप्त होतो. न करणाऱ्यांना नरकात जावं लागू शकतं. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की, आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशी व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे. देवशयनी एकादशी व्रत कथा - सूर्यवंशात एक महान प्रतापी आणि सत्यवादी राजा मांधाता होता. तो चक्रवर्ती राजा होता. तो आपल्या मुलांप्रमाणे प्रजेची सेवा करत असे. सगळे आनंदात जगत होते. पण, एकदा त्यांच्या राज्यात सलग 3 वर्षे पाऊस पडला नाही, त्यामुळे अन्नधान्य कमी पडू लागले आणि दुष्काळ पडला. खाण्या-पिण्यासोबतच यज्ञ वगैरे करण्यासाठीही अन्नही मिळत नव्हते.

News18लोकमत
News18लोकमत

लोक त्यांच्या राजाकडे यायचे आणि त्याला या दुष्काळाचा सामना करण्याची विनंती करायचे. पण राजाही विवंचनेत होता. त्याला आपल्या प्रजेची बिकट अवस्था बघवत नव्हती. एके दिवशी तो सैन्यासह जंगलात गेला. तो अनेक ऋषी-मुनींच्या आश्रमात गेला. बर्‍याच दिवसांनी तो ब्रह्मदेवांचा पुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहचला. अंगिरा ऋषींना नमस्कार करून राजाने येण्याचे प्रयोजन सांगितले. राजाने अंगिरा ऋषींना सांगितले की, दुष्काळामुळे त्यांच्या राज्यात हाहाकार माजला आहे. लोक अन्नासाठी व्याकूळ आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ होत नाही. तुम्ही मला या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सांगा. Rashichakra: केतू ठरणार डोकेदुखी, तुम्हाला अडचणीत आणेल; या 5 राशींनी जपून राहावं तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले की हे राजन! या संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळणे. त्याच्या पुण्य प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल. त्यामुळे समृद्धी येईल, जनता सुखी होईल आणि अन्न संकट दूर होईल. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे उपद्रव दूर होऊन सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. हे व्रत तुमच्या संपूर्ण प्रजाजनांसह आणि मंत्र्यांसह करा. राजा अंगिरा ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरात परतला. पद्म एकादशीच्या दिवशी त्यांनी सर्व प्रजाजन आणि मंत्र्यांसह विधिवत हे व्रत पाळले. या व्रताचे पुण्य लाभल्याने राज्यात चांगला पाऊस झाला, त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले आले. त्याचे राज्य पुन्हा संपत्ती आणि धान्याने परिपूर्ण झाले. लोक सुखाने राहू लागले. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात