मुंबई, 13 जुलै : यावेळी गुरुपौर्णिमेला बुधादित्य योगाव्यतिरिक्त रुचक, हंस, भद्रा आणि शश नावाचे चार राजयोग तयार होत आहेत, ते सर्व प्रकारे शुभ आणि मंगलकारक असतील. या दिवशी केलेल्या गुरुपूजेचे फळ अनेक पटीने मिळते. गुरुभक्तीच्या या सणाला दिलेली गुरुदक्षिणाही या योगांमुळे अत्यंत शुभ ठरेल. या दिवशी घेतलेली गुरू दीक्षा ज्ञान, बुद्धी आणि अभ्यासाला शुद्धता आणि पवित्रता देईल आणि आपल्यामध्ये नवीन उर्जेचा संचार (Guru Purnima 2022) होईल. दैनिक भास्कर ने दिलेल्या माहितीनुसार, ऊर्जेचा कारक सूर्य, बुद्धिमत्ता, वाणी आणि ज्ञानाचा अधिपती बुध आणि सुख-समृद्धी देणारा शुक्र हे तिघेही मिथुन राशीत राहणार आहेत. महाभारताचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणून या दिवसाला गुरुपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणतात. हा दिवस मुळातच शुभ आहे, परंतु यावेळी पाच शुभ योगांनी त्याचे शुभत्व आणखी वाढले आहे. या शुभ योगांमध्ये केलेली गुरुपूजा फलदायी ठरेल, असे पंडित सांगतात. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा या दिवशी घेतलेली गुरु दीक्षा आणि गुरुदक्षिणा आयुष्यभर आनंदी राहण्यासोबतच यशाचा मार्ग मोकळा करेल. सूर्य सध्या मिथुन राशीत असून 17 तारखेला कर्क राशीत प्रवेश करेल. बुध देखील मिथुन राशीत आहे, तो 16 तारखेला कर्क राशीत जाईल. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर सूर्य, बुध आणि शुक्र योग - 13 जुलै रोजी सूर्य, बुध आणि शुक्र मिथुन राशीत राहिल्याने बुधादित्य योग तयार होईल. या योगातील पूजा आणि खरेदीचे सुखद परिणाम मिळतील. पौर्णिमेला मंगळ, गुरू, शनि आणि चंद्राची संक्रामक स्थिती अशा प्रकारे असेल की या दिवशी रुचक, भद्रा, हंस आणि षष्ठ योग देखील तयार होतील. हा योग राजयोगासारखा आहे. सूर्य हा ऊर्जेचा स्वामी आहे, बुध हा बुद्धिमत्ता आणि बुद्धीचा अधिपती आहे आणि शुक्र हा सुख आणि समृद्धीचा अधिपती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.