जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Mahamrityunjay mantra: अकाली मृत्यू टाळण्यासाठी या मंत्राचा करतात जप; श्रावणात पठण करण्याचा विशेष लाभ

Mahamrityunjay mantra: अकाली मृत्यू टाळण्यासाठी या मंत्राचा करतात जप; श्रावणात पठण करण्याचा विशेष लाभ

महामृत्युंजय मंत्र

महामृत्युंजय मंत्र

शिव पुराणात सांगितले आहे की, श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. पुराणानुसार जो व्यक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करतो. त्याचा…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : महादेवाची पूजा आणि व्रत-उपवासासाठी पवित्र मानला जाणार श्रावण महिना लवकरच म्हणजे 18 जुलै 2023 रोजी सुरू होत आहे. यावेळी अधिक महिन्यामुळे श्रावण महिना 59 दिवसांचा असणार आहे. श्रावण महिन्यात शंभू-महादेवाची विशेष पूजा केली जाते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक शिवालयात जाऊन जलाभिषेक करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानं मनुष्याला दीर्घायुष्याचे सौभाग्य प्राप्त होते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंत्र जप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. श्रावण महिन्यात मंत्रजप केल्यानं असा फायदा होतो - हिंदू धर्मग्रंथ, शिव पुराणात सांगितले आहे की, श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. पुराणानुसार जो व्यक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करतो. त्याचा अकाली मृत्यू टळतो, त्याला चांगले आरोग्य मिळते. याशिवाय जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासूनही मुक्ती मिळू शकते. महामृत्युंजय मंत्र आणि त्याचा अर्थ ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ अर्थ - या शक्तिशाली मंत्राचा अर्थ असा आहे की, आपण सर्वजण या विश्वाचे पालनहार, त्रिनेत्र असलेल्या भगवान भोलेनाथ यांची पूजा करतो. या जगात सुगंध पसरवणारे भगवान शिव आम्हांला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करोत, जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळू शकेल. चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा या चुका करू नका - - मंत्र जपताना मंत्राच्या उच्चारात कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्या. - महामृत्युंजय मंत्राचा फक्त रुद्राक्षाच्या जपमाळाने जप करा. - या मंत्राचा जप करताना भगवान शिवाची मूर्ती, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र जवळ ठेवावे. - या मंत्राचा रोज ठराविक वेळेत जप करा, वेळ पुन्हा बदलू नका. - आसनावर बसून मंत्राचा जप करावा. - ध्यानात ठेवा की मंत्र जपताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात