जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / 12 वर्षांनी चंद्रग्रहणाला जुळलाय असा चतुर्ग्रही योग, भाग्यशाली असणार या 4 राशी

12 वर्षांनी चंद्रग्रहणाला जुळलाय असा चतुर्ग्रही योग, भाग्यशाली असणार या 4 राशी

चंद्रग्रहणाचा राशींवर परिणाम

चंद्रग्रहणाचा राशींवर परिणाम

हे चंद्रग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात लागत आहे. मेष राशीमध्ये 12 वर्षांनंतर सूर्य, बुध, गुरु आणि राहूचा चतुर्भुज योग तयार होत आहे, या योगामध्ये चंद्रग्रहण असल्यानं..

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. ज्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व 12 राशींवर दिसतो. 2023 मध्ये 4 ग्रहणे होत आहेत. त्यापैकी पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले. आता 5 मे 2023 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत आहे. याच दिवशी बुद्ध पौर्णिमाही आली आहे. हे चंद्रग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात लागत आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेष राशीमध्ये 12 वर्षांनंतर सूर्य, बुध, गुरु आणि राहूचा चतुर्भुज योग तयार होत आहे, या योगामध्ये चंद्रग्रहण होणार आहे. 15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करताच हा योग संपेल. मेष - ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांची राशी मेष आहे त्यांच्यासाठी वर्षाचे पहिले चंद्रग्रहण अनेक शुभ संधी घेऊन येत आहे. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळू शकतो. सिंह - ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांची राशी सिंह आहे, त्यांच्यासाठी वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कुटुंबात सुख-समृद्धी घेऊन येत आहे. रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील. काही मोठी उपलब्धी तुमच्या हातात येऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

धनु - ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी धनु आहे त्यांना करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत असणार आहेत. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. याशिवाय आत्मविश्वास वाढेल. मीन - ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी मीन आहे, त्यांच्यासाठी वर्षातील पहिले चंद्रग्रहण पैशाशी संबंधित समस्या दूर करेल, असे मानले जाते. तुमच्या करिअरला नवी दिशा मिळू शकते. या दरम्यान तुम्हाला प्रिय व्यक्ती आणि जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे हे चमत्कारिक फायदे; हसतं-खेळतं राहतं कुटुंब यांना काळजी घ्यावी लागेल - ज्योतिष शास्त्रानुसार स्वाती नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय तूळ राशीच्या लोकांनाही काळजी घ्यावी लागेल कारण वर्षातील पहिले चंद्रग्रहण तूळ राशीत होत आहे. शनी मागे लागलाच म्हणून समजा; जीवनात अशी कामं करणाऱ्यांना शनी सोडत नाही कधी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात