मुंबई, 19 मार्च : यावेळी चैत्र नवरात्री आणि पवित्र रमजान महिन्याला एकत्रच सुरुवात होईल. त्यासाठी उपवास करणाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात 22 मार्चपासून होत असून नवरात्रीची समाप्ती 30 मार्चला होणार आहे. तर रमजान 22 किंवा 23 मार्चपासून सुरू होईल आणि 22 एप्रिल रोजी पूर्ण होईल. यंदा 110 वर्षांनंतर नवरात्रीमध्ये 16 विशेष योग आणि 4 सर्वार्थ सिद्धी, 4 रवियोग, 2 अमृत सिद्धी योग आणि एक गुरुपुष्प असे 11 योग तयार होत आहेत. वाहन, घर, जमीन, इमारत, कपडे, दागिने खरेदीसाठी हे योग शुभ मानले जातात. यावेळी देवी नौकेत स्वार होऊन येत आहे, ती स्थिती अत्यंत फलदायी ठरेल. नवरात्रही नऊ दिवस चालणार आहे. शुक्ल आणि ब्रह्मयोग असताना मातेचे पहिले रूप असलेल्या शैलपुत्रीच्या पूजेसह घटस्थापना केली जाईल. यावेळी संपूर्ण नऊ नवरात्र असतील, असे पंडित दीपक शास्त्री यांनी सांगितले. यामध्ये मातेचे आगमन बोटीवर होणार असून प्रस्थान डोलीवर होणार आहे. त्यांनी सांगितले की, यावर्षीचा राजा बुध असेल आणि मंत्री शुक्र असेल. सर्वात मोठा रोजा 13 तास 50 मिनिटांचा असेल - गेल्या वर्षीच्या तुलनेत रमजान महिन्यात या वेळी दीर्घ उपवासाचा कालावधी कमी होईल, ही घट वर्षानुवर्षे होत आहे. यावेळी उपवास एक तासाने कमी असेल, यावेळी मुकद्दस रमजानचा सर्वात मोठा उपवास 13 तास 50 मिनिटांचा असेल. तर गेल्या वर्षी हा उपवास 14 तास 52 मिनिटांचा होता. हा पवित्र उपवास करणारे रमजानची आतुरतेने वाट पाहत असून मुस्लिम भागातही रमजानची तयारी सुरू झाली आहे. मुस्लिम समुदायामध्ये रमजानचा महिना सर्वात पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात मुस्लिम लोक उपवास आणि उपासना करतात. जर निश्चित तारखेला चंद्र दिसला तर 22 मार्चपासून रमजान महिना सुरू होईल.
प्रार्थना करून पापांची क्षमा मागतात - प्रत्येक दिवसाचा कालावधी चंद्रानुसार ठरवला जातो. प्रत्येक रमजानमध्ये वेळेत फरक असतो. त्यामुळे यंदा उपवासाची वेळ कमी होणार आहे. गेल्या वर्षी एप्रिलपासून सुरू झालेला रमजान महिना 3 मे रोजी संपला होता. यावेळी 22 किंवा 23 मार्चपासून रमजान मुबारक महिना सुरू होईल. नायब शहर इमाम मुफ्ती फहद अली म्हणतात की, जर चंद्र दिसला तर पहिला उपवास 22 मार्चला होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपवासाच्या वेळेत तफावत असणार आहे. हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)