मुंबई, 19 एप्रिल : चैत्र मासातील कृष्ण पक्षातील अमावास्येला चैत्र अमावस्या साजरी केली जाईल. कोणत्याही महिन्यातील अमावस्या तिथी धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. या दिवशी स्नान-दान केल्यानं पुण्य मिळतं. अमावस्येच्या दिवशी स्नान-दान-धर्म केल्यानं पितरांची प्रसन्नता मिळते. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्या मते यावेळी चैत्र अमावस्येच्या दिवशी 3 शुभ संयोग घडत आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होत असून या दिवशी दक्षिण भारतात शनी जयंती साजरी केली जाते. याशिवाय चैत्र अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. जाणून घेऊया चैत्र अमावस्येची माहिती आणि स्नान दानासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे? चैत्र अमावस्या 2023 तिथी मुहूर्त - हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्याची अमावस्या 19 एप्रिल रोजी सकाळी 11:23 पासून सुरू होईल आणि ही तिथी 20 एप्रिल रोजी सकाळी 09:41 पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या आधारे चैत्र अमावस्या 20 एप्रिलला आहे. सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावस्येला स्नान-दान - चैत्र अमावस्येच्या दिवशी, सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 05:51 ते रात्री 11:11 पर्यंत वैध आहे, तर प्रीति योग दुपारी 01:01 वाजेपर्यंत वैध आहे. ज्यांना चैत्र अमावस्येला स्नान करून दान करायचे आहे, ते सर्वार्थ सिद्धी योगात सकाळी स्नान करून दान करू शकतात.
चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण - या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिलला चैत्र अमावस्येला होणार आहे. सूर्यग्रहणाची वेळ सकाळी 07:04 ते दुपारी 12:29 पर्यंत आहे. या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी वैध नसला तरी. अशावेळी तुम्ही चैत्र अमावस्येला ग्रहणाच्या आधी सकाळी स्नान-दान कार्य करू शकता. चैत्र अमावस्येला शनि जयंती - दक्षिण भारतात शनि जयंती चैत्र अमावस्येला साजरी केली जाते, तर उत्तर भारतात शनिदेवाची जयंती ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते. चैत्र अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करून त्यांची संबंधित उपाय केल्यास शनी साडेसाती, महादशामध्ये लाभ होतो. हे वाचा - थोडे दिवस नाही मिळणार नशीबाची साथ; गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना वैताग आणणार चैत्र अमावस्येचे महत्त्व - चैत्र अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर पितरांसाठी तर्पण, पिंडदान इत्यादी करू शकता. मग तुम्ही भगवान विष्णूची पूजा करा किंवा भगवान श्रीकृष्णाच्या माधव रूपाची पूजा करा. यामुळे तुमचे संकट दूर होतील आणि पापही नष्ट होतील. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. हे वाचा - सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)