जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Astro: वाईट परिस्थिती असते तेव्हा पाकिटात ठेवा या गोष्टी; अडचणीतून निघतात सोपे मार्ग

Astro: वाईट परिस्थिती असते तेव्हा पाकिटात ठेवा या गोष्टी; अडचणीतून निघतात सोपे मार्ग

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

नकारात्मक विचारसरणीमुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. मात्र, पाकिट-पर्समध्ये ठेवलेल्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी अशा सर्व समस्यांवर उपाय ठरू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै : अनेकांना कष्ट केल्याचा चांगला मोबदला मिळत नाही. कुंटुंबाची असलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती मिळकत किंवा मोबदला पुरत नाही. महत्त्वाच्या कामांमध्ये काही-ना-काही अडचणी येतात. प्रत्येक काम करताना विविध गोष्टींबद्दल शंका येत राहतात. काहीतरी वाईट घडण्याची भीती मनात राहते. या नकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास कमी होतो. मात्र, पाकिट-पर्समध्ये ठेवलेल्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी अशा सर्व समस्यांवर उपाय ठरू शकतात. टॅरो आणि मॅनिफेस्टेशन कोच लोपामुद्रा गोगोई यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत काही माहिती शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये लोपामुद्रा गोगोई यांनी सांगितले की, काही गोष्टी पाकिट-पर्समध्ये किंवा जवळ ठेवल्यास तुम्ही आयुष्यात खूप काही बदलू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

या गोष्टी पर्समध्ये ठेवा - टॅरो तज्ज्ञ लोपामुद्रा गोगोई यांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पर्समध्ये ठेवल्या पाहिजेत. आणि अशी एक गोष्ट सांगितली आहे, जी झोपताना डोक्याशी ठेवावी. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात रोजच्या कामात वापरल्या जातात, पण त्यांचा परिणाम आपल्याला माहीत नसतो. त्या कशा वापरायच्या ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या. वेलची - टॅरो रीडरनुसार पर्समध्ये किमान पाच वेलची ठेवावीत. लोपामुद्रा गोगोई यांच्या मते, असे केल्याने पैसे आकर्षित होतात. Budh Rashi Parivartan: 8 जुलैपासून या राशींचे अच्छे दिन, होईल धनवर्षा लवंग - नकारात्मक विचार, उर्जेमुळे तुमचा विकास होत नसेल तर तुमच्या पर्समध्ये किमान 9 लवंगा ठेवाव्यात. लोपामुद्रा गोगोई यांच्या मते असे केल्याने तुम्ही नकारात्मक उर्जेपासून दूर राहता. बडीशेप - एखाद्या पुडीत बडीशेप भरून घ्या. पण ही पुडी पर्समध्ये ठेवू नका. गोगोई यांच्या मते, तुम्ही झोपण्यापूर्वी ही पुडी तुमच्या उशी शेजारी ठेवा. असे केल्याने झोप चांगली लागते आणि वाईट स्वप्ने दूर राहतात. दालचिनी - पर्समध्ये दालचिनी ठेवा. यामुळे तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित चांगले पर्याय मिळत राहतील. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात