मुंबई, 09 सप्टेंबर : कर्ज किंवा उधारीने पैसे घ्यायला तसं कोणालाच आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती कधीही येऊ नये की, कर्ज घ्यावे लागेल. परंतु जीवनात वेळ सारखी नसते आणि अनेक चढ-उतार येतात. कधी कधी इच्छा नसतानाही कर्ज घ्यावे लागते, तेव्हा असा पेच निर्माण होतो. तथापि, समस्या सोडवण्यासाठी आणि गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्ज घेणे ही वाईट गोष्ट नाही. पण जेव्हा व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबली जाते आणि कर्जाच्या ओझ्यातून सुटका होत नाही तेव्हा समस्या अधिक गुंतागुंतीची होते. ज्योतिष शास्त्रामध्ये कर्जाच्या व्यवहाराशी संबंधित आवश्यक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्यामुळे कर्ज व्यवहार करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. काही ठराविक दिवसांमध्ये कर्ज घेतल्याने त्याचा बोझा वाढत जातो, कर्जाचे व्यवहार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांनी माहिती दिली आहे. या दिवसात कर्ज घेऊ नये - ज्योतिष शास्त्रानुसार कर्ज घेताना आठवड्यातील काही दिवस लक्षात ठेवावेत. मंगळवार, शनिवार, रविवार या तीन दिवशी कधीही कर्ज घेऊ नये. आठवड्यातील या दिवसांमध्ये कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड करणे कठीण होते. या दिवसात कर्ज घेतल्याने व्यक्तीला कर्जापेक्षा जास्त व्याज द्यावे लागू शकते. हे वाचा - या राशीचे लोक असतात खूप सपोर्टिव्ह, तुमच्याही आयुष्यात आहे का अशी एखाद व्यक्ती? योग कालावधी पण पाहायचा - कर्ज घेताना या दिवसांसह योग लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्रात एकूण 27 पैकी अशा तीन योगांविषयी सांगितले आहे की, ज्यामध्ये कर्ज घेऊ नये. ज्योतिष शास्त्रानुसार वृद्धी योग, द्विपुष्कर योग आणि त्रिपुष्कर योगामध्ये कर्ज घेऊ नये. वृद्धी योगात कर्ज घेतल्याने कर्जात वाढ होते. द्विपुष्कर योगात कर्ज घेतल्याने कर्जाचा भार दुप्पट होतो आणि त्रिपुष्कर योगात घेतलेले कर्ज तिप्पट होते. कर्ज देतानाही या गोष्टी लक्षात ठेवा कधीकधी कर्ज घेण्यापेक्षा देणेही खूप त्रासदायक ठरते. परिस्थिती अशी बनते की, दिलेले कर्ज परत मिळणे अवघड होऊन बसते, त्यामुळे कोणालाही कर्ज देतानाही वेळ लक्षात ठेवा. हे वाचा - एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत? (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.