जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vastu Tips : ही मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते, जाणून घ्या यासंबंधित फेंगशुई टिप्स

Vastu Tips : ही मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते, जाणून घ्या यासंबंधित फेंगशुई टिप्स

Vastu Tips : ही मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते, जाणून घ्या यासंबंधित फेंगशुई टिप्स

मांजरदेखील आनंद, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे. जपानी मांजरीला पैशांची मांजर असेही म्हणतात. असे म्हटले जाते की फेंगशुईमध्ये याचे खूप महत्त्व आहे. ही भाग्यवान मांजर घरात आणि कामाच्या ठिकाणी ठेवल्यास प्रगतीचा मार्ग खुला होतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर : जगात मांजराबद्दल अनेक गैरसमज आहेत, पण मांजर सुख, समृद्धी आणि शांतीचेही प्रतीक आहे. फेंगशुई शास्त्रात ही गोष्ट सांगितली आहे. फेंगशुईनुसार या भाग्यवान मांजरीला क्रिस्टल टर्टल, विंड चाइम्स, लाफिंग बुद्धा त्यांच्यासोबत घरात आणि कामाच्या ठिकाणी ठेवल्यास प्रगतीचा मार्ग खुला होतो. या जपानी मांजरीला मनी कॅट असेही म्हणतात. फेंगशुईमध्ये याला खूप महत्त्व आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की फेंगशुई जपानी मांजरीमागे एक कथा आहे. जाणून घेऊया जपानी मांजर आपल्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकते. जपानी मांजर कथा असे मानले जाते की एकदा धनाचे देवता भेटायला आले होते. यादरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. दुसऱ्याच क्षणी त्यांची नजर एका मांजरीवर पडली, जी त्यांना हाक मारत होती. यावर धनाचे देवता मांजरीपर्यंत पोहोचले. ते मांजरीकडे जाण्यासाठी निघालेले असता, विजेच्या झटक्याने झाड नष्ट झाले, ज्याच्या खाली काही क्षणांपूर्वी धनाचे देवता उभे होते.

Vastu Tips : घड्याळ, कपड्यांसह इतरांच्या या वैयक्तिक गोष्टी वापरू नका, होऊ शकते मोठे नुकसान

मांजरीने धानाच्या देवतेचे प्राण वाचवले असे म्हणतात. यानंतर त्यांनी मांजरीच्या मालकाला संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद दिले. काही काळानंतर जेव्हा मांजर मरण पावली तेव्हा तिच्या मालकाने मांजरीचा पुतळा बनवला, ज्याला त्याने मानेकी निको असे नाव दिले. असे मानले जाते की तेव्हापासून लोकांनी सुरक्षितता आणि समृद्धीसाठी या मांजरीची मूर्ती घरात ठेवण्यास सुरुवात केली. Vastu: घरासमोर अशा गोष्टी बिलकूल असू नयेत; दारिद्र्य वाढतं, नाही मिळत सुख-शांती मांजर घरात या दिशेला ठेवा - सोनेरी पिवळ्या रंगाची मांजर घरात ठेवल्याने व्यवसायात प्रगती होते. - धन-समृद्धीसाठी कुबेराच्या दिशेला आग्नेय दिशेला निळी मांजर ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे कामात यश मिळते आणि पैशाची कमतरता भासत नाही. - घरात सुख-समृद्धी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी हिरवी मांजर उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. - वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी लाल रंगाची मांजर नैऋत्य दिशेला ठेवणे शुभ असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात