जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शेगावचं 'आनंद सागर' अध्यात्मिक केंद्र सुरू; पर्यटक, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

शेगावचं 'आनंद सागर' अध्यात्मिक केंद्र सुरू; पर्यटक, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

शेगाव आनंद सागर आध्यात्मिक केंद्र

शेगाव आनंद सागर आध्यात्मिक केंद्र

गेल्या अनेक वर्षांपासून आनंद सागर बंद आहे. त्यामधील अनेक उपक्रम बंद आहेत. टप्प्याटप्प्याने उपलब्ध निधीनुसार काही उपक्रम सुरू करण्यात येतील असे आनंद सागर मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बुलढाणा, 04 मे : जिल्ह्यातील शेगाव येथील आनंद सागर अध्यात्मिक केंद्र गेल्या काही वर्षापासून बंद होते. आनंद सागर सुरू होईल का? किंवा केव्हा सुरू होईल? असे अनेक प्रश्न भाविकांकडून विचारले जात होते, मात्र आता मंदिर प्रशासनाने आपली भूमिका जाहीर केली आहे. आनंद सागर येथील अध्यात्मिक केंद्र मंदिर प्रशासनाने आजपासून भाविकांसाठी सुरू केले आहे. सकाळी 10 ते 05 वाजेपर्यंत हे अध्यात्मिक केंद्र सुरू असणार आहे. त्यामुळे आजपासून आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्राला भाविकांना भेट देता येणार आहे. गजानन महाराज भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आनंद सागर बंद आहे. त्यामधील अनेक उपक्रम बंद आहेत. टप्प्याटप्प्याने उपलब्ध निधीनुसार काही उपक्रम सुरू करण्यात येतील असे आनंद सागर मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आनंद सागर हे शेगांव येथील मनोहारी उद्यान आणि ध्यान केंद्र आहे. हे केंद्र संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे 200 एकर जमिनीवर शेगांव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत तसेच मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे. संत गजानन महाराज संस्थांकडून 2001 साली सरकारकडून लीजवर जमीम घेतली होती. “आनंद सागर” मुळे शेगांव हे जगाच्या नकाशावर येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि पर्यटन वाढलं होत. अनेक भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटनासाठी यायचे. पण, मध्यंतरी काही कारणामुळे शेगांव संस्थानाने कट्याच्या डागडुजी, रंगकाम व इतर कामासाठी हे भवन बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता भक्तांच्या सोयीसाठी हे काम लवकरात लवकर संपवून लोकांचा गैरसोय होऊ नये या उद्देशाने आनंद भवन सुरू करण्यात आलं आहे. शनीच्या ग्रहस्थितीमुळं दुर्मिळ शश महापुरुष योग; या 5 राशीच्या लोकांसाठी वरदान गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर शेगांवातील आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत होते, तसेच कधी सुरु करणार असा सवालही विचारण्यात येत होता. अशा आशयाचे संदेश देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. मात्र, याला आता पूर्णविराम

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात