जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / एका ताऱ्यानं केला खोळंबा! अक्षय्य तृतीयेला यंदा नाही वाजू शकणार सणई-चौघडे

एका ताऱ्यानं केला खोळंबा! अक्षय्य तृतीयेला यंदा नाही वाजू शकणार सणई-चौघडे

अक्षय्य तृतिया विवाह मुहूर्त

अक्षय्य तृतिया विवाह मुहूर्त

कोणत्याही शुभ कार्यासाठी तिथी उपलब्ध नसेल तर ती अक्षय्य तृतीयेला करता येते. परंतु, यावेळी या तारखेला विवाह करणे शक्य होणार नाही. कारण अक्षय्य तृतीयेला मांगल्याचा कारक गुरू तारा या वेळी अस्त राहणार आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उदयपूर, 12 एप्रिल : दरवर्षी अक्षय्य तृतीया (अखा तीज) हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिलला साजरी होणार आहे. ही शुभ तिथी अबुझा मुहूर्त मानली जाते आणि या दिवशी अनेक विवाह होतात. असे मानले जाते की, जर कोणत्याही शुभ कार्यासाठी तिथी उपलब्ध नसेल तर ती अक्षय्य तृतीयेला करता येते. परंतु, यावेळी या तारखेला विवाह करणे शक्य होणार नाही. कारण अक्षय्य तृतीयेला मांगल्याचा कारक गुरू तारा या वेळी अस्त राहणार आहे. ‘अक्षय’ म्हणजे अखंड आनंद, ज्याचा क्षय होत नाही, शाश्वत, यश आणि तृतीया म्हणजे ‘तृतीय’. अक्षय्य तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान खूप लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. मुलीचे आयुष्य शाश्वत राहावे म्हणून वडील कन्यादान करतात. यासोबतच अक्षय्य तृतीयेला विविध प्रकारचे धान्यही दान केले जाते. कारण, शेतकऱ्यांकडे गव्हाचे पीक घरोघरी येते. ज्योतिषशास्त्र काय सांगतं? उदयपूर शहरातील जनार्दन राय विद्यापीठ महाविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्राचार्या डॉ.अलकनंदा शर्मा यांनी सांगितले की, यावेळी शुभ कार्यांचा सूचक मानला जाणारा गुरुचा तारा अस्त पावत आहे. या एका कारणास्तव अक्षय्य तृतीयेला शुभ कार्य केले जाणार नाही. तारा 30 मार्च रोजी मावळला होता, जो 28 एप्रिल रोजी उगवेल. यानंतरच मांगलिक कामे होतील.

News18लोकमत
News18लोकमत

लग्नासाठी मुहूर्त नाही - कित्येक वर्षांनंतर असा योगायोग घडला की, यावेळी अक्षय तृतीयेला लग्नाचा मुहूर्त नाही. ज्योतिषाचार्यांच्या मते 27 एप्रिलपर्यंत गुरु अस्तात आहे. गुरू ग्रहाच्या अस्तामुळे विवाह शास्त्रानुसार होत नाही. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेला लग्नाचा मुहूर्त नाही. 27 एप्रिल नंतर लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. दरवर्षी अक्षय्य तृतीयेला मोठ्या संख्येने लोक विवाह करतात, पण यंदा तसं होणार नाही. हे वाचा -   सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात