मुंबई, 22 एप्रिल : हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. आज 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शुभ कार्ये केल्याने शुभ फळ मिळते. अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचा महिमा भगवान श्रीकृष्णानेच युधिष्ठिराला सांगितला होता. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी सनातन धर्माचे लोक देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मंत्रांचा जप केल्यानं घरात देवी लक्ष्मीचा वास तर राहतोच, शिवाय आर्थिक स्थितीही चांगली होते. आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करावा, याविषयी जाणून घेऊ.
या मंत्रांचा असा करा जप - ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम सांगतात की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची विधिनुसार पूजा केली जाते आणि लक्ष्मी मंत्रांचा जप केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चौरंगावर लाल कापड अंथरूण उत्तर दिशेला लक्ष्मीची पूजा सुरू करा. शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा आणि नंतर चंदनाच्या माळांनी कोणत्याही मंत्राच्या पाच फेऱ्या जप करा. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, असे मानले जाते. हे वाचा - अक्षय्य तृतियेला लागून आलीय विनायक चतुर्थी; पहा पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि शुभ योग 1. ॐ अमृत लक्ष्म्यै नम: ॥ 2. ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले ॥ 3. ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः ।। 4. ॐ सौभाग्य लक्ष्म्यै नम: ॥ 5. सर्वाबाधा विनिर्मुक्तो, धन धान्यः सुतान्वितः। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः॥ 6. कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥ 7. ॐ विद्या लक्ष्म्यै नम: ॥ 8. ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥ 9. दानेन भुतानि वशीभवन्ति दानेन वैराण्यपि यान्ति नाशम्। परोऽपि बन्धुत्वमुपैति दानैर्दान हि सर्वव्यसनानि हन्ति॥ 10. गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात् । स्थितिः उच्चैः पयोदानां पयोधीनाम अधः स्थितिः ॥ हे वाचा - यंदाची अक्षय्य तृतिया जीवनात आणेल राजयोग; पूजेला बसल्यावर ही गोष्ट नक्की करा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)