मुंबई, 21 एप्रिल : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाईल. या दिवशी रात्री स्वर्ग भद्रा लागली असेल, परंतु विनायक चतुर्थीची पूजा दिवसा केली जाते. त्यामुळे पूजेवर भद्रकाळाचा प्रभाव असणार नाही. विनायक चतुर्थीला व्रत ठेवून गणेशाची पूजा केली जाते. मंगलमूर्ती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व कार्ये सफल होतात, जीवनातील अशुभ परिणाम नष्ट होतात, असे मानले जाते. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ, विनायक चतुर्थी व्रत कधी आहे? पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि शुभ योग कोणते आहेत? वैशाख विनायक चतुर्थी 2023 - हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 23 एप्रिल रोजी सकाळी 07.47 वाजता सुरू होते आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 24 एप्रिल रोजी सकाळी 08.24 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत रविवार, 23 एप्रिल रोजी विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. विनायक चतुर्थी पूजा मुहूर्त 2023 वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थी व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त 23 एप्रिल रोजी सकाळी 11.01 वा. या दिवशी तुम्ही दुपारी 01:38 पर्यंत गणेशाची पूजा करू शकता. विनायक चतुर्थीला पूजेचा शुभ मुहूर्त अडीच तासांपेक्षा जास्त असतो.
विनायक चतुर्थी व्रत 3 शुभ योगांमध्ये - या वर्षी वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थी 3 शुभ योगात आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी रवियोग, सौभाग्य योग आणि शोभन योग तयार होत आहेत. सौभाग्य योग पहाटेपासून 08:22 पर्यंत आहे. त्यानंतर शोभन योग सुरू होतो, जो दिवसभर राहील. याशिवाय पहाटे 05.48 ते रात्री 12.27 पर्यंत रवि योग असेल. हे तीन योग पूजा आणि शुभ कार्यासाठी शुभ आहेत. या दिवसाचा अभिजित मुहूर्त सकाळी 11.54 ते दुपारी 12.46 पर्यंत आहे. हे वाचा - लक्ष्मी कृपेचा वर्षाव! अक्षय्य तृतीयेला राशीनुसार सोने किंवा हे धातू खरेदी करा विनायक चतुर्थीला स्वर्ग भद्रा - यंदा विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी स्वर्ग भद्रा आहे. ती रात्री 08:01 वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05:47 पर्यंत असेल. या भद्राचे निवासस्थान स्वर्गात आहे. विनायक चतुर्थीला चंद्रोदय - विनायक चतुर्थीला चंद्रोदय सकाळी 07.45 पासून होईल आणि चंद्रास्त रात्री 10.17 वाजता होईल. हे वाचा - अमावस्येची काळीरात्र यांच्यासाठी जणू दिवाळी; जळणाऱ्या चितेवर केले तांत्रिक विधी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)