जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / बागेश्वर बाबानंतर आता नाथेश्वर सरकारचा बोलबाला; मंदिर खचाखच, परिसरही भरगच्च!

बागेश्वर बाबानंतर आता नाथेश्वर सरकारचा बोलबाला; मंदिर खचाखच, परिसरही भरगच्च!

पहिल्या दिवशी 16 जणांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्यांवर उपाय सांगण्यात आले.

पहिल्या दिवशी 16 जणांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्यांवर उपाय सांगण्यात आले.

या दरबारात भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. मंदिर खचाखच भरल्यानंतर मंदिर परिसरातही रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या.

  • -MIN READ Local18 Sagar,Madhya Pradesh
  • Last Updated :

अनुज गौतम, प्रतिनिधी सागर, 19 जून : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीझोतात आहेत. त्यांच्या दरबाजाराची सध्या देश-विदेशात चर्चा आहे. त्याच धर्तीवर मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात आणखी एका बाबांनी भव्य दरबार भरवलं. या दरबारात भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. मंदिर खचाखच भरल्यानंतर मंदिर परिसरातही रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या. नाथेश्वर सरकारचे प्रमुख ओंकार महाराज यांनी सागरच्या पहलवान मंदिरात हा दरबार भरवला होता. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्याप्रकारे लोकांच्या समस्यांवर उपाय सांगतात, त्याचप्रमाणे ओंकार महाराजांनी लोकांकडून समस्या अर्ज स्वीकारून त्यांवर उपाय सांगितले. ओंकार महाराज म्हणाले, पंडोखर सरकार, बागेश्वर सरकार आणि नाथेश्वर सरकार हे सर्व एकच आहेत. कारण त्या सर्वांवर बालाजीची कृपा आहे.

अर्ज करण्यासाठी राम नामाचा जप करणं, लोकांना नावाने हाक मारणं, आधी काहीतरी लिहून मग प्रश्न विचारणं आणि अर्जपत्रिकेत तेच लिहिलेलं असल्यास बालाजीची कृपा सांगून आशीर्वाद देणं. असा दरबार पार पडला. दोन दिवस चाललेल्या या दरबारात शेफाली मिश्रा यांच्या नावाने पहिला अर्ज स्वीकारण्यात आला. त्यांना काय समस्या आहे असं विचारल्यावर त्यांनी तब्येत ठीक नसते त्यावर काही उपाय आणि नोकरी मिळेल की नाही? असे प्रश्न विचारले. ओंकार महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही हेच प्रश्न निघाले. त्यावर ते म्हणाले, नोकरी मिळण्याचा योग सध्या नाही. मात्र शेफाली यांनी नोकरी तर करायचीच आहे असं म्हटलं. त्यावर महाराजांनी बालाजीची कृपा असेल तर नोकरी नक्की मिळेल, परंतु आता योग नाही असं सांगितलं. त्याचबरोबर 6 वर्षांपूर्वी नोकरी मिळण्याचा योग होता, परंतु त्यावेळी काही अंकांमुळे वेळ खराब होती, असं ते म्हणाले. वयाच्या 12 व्या वर्षी लग्न, 6 महिन्याआधी झाला बाप; घर सोडून जाणाऱ्या व्यक्तीने NEET मध्ये मारली बाजी त्याचबरोबर मुलीच्या प्रकृतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वेळ लागेल पण सर्वकाही ठीक होईल, असं सांगितलं. तसेच मंदिरात येऊन लाल कपड्यात लवंग आणि नारळ बांधून प्रार्थना करण्याचा सल्लाही दिला. दरम्यान, पहिल्या दिवशी 16 जणांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्यांवर उपाय सांगण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात