मराठी बातम्या /बातम्या /religion /

Solapur : 900 वर्ष जुन्या परंपरेनं सिद्धेश्वर यात्रेला सुरूवात, पाहा Video

Solapur : 900 वर्ष जुन्या परंपरेनं सिद्धेश्वर यात्रेला सुरूवात, पाहा Video

X
सोलापूरचे

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 12 जानेवारी : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. परंपरेप्रमाणे तैलाभिषेक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरी कुंभार कुटूंबीयांकडून आदण म्हणून हिरेहब्बू कुटूंबांकडे 56 मातीच्या घागरी देण्यात आल्या आहेत. गेल्या 900 पेक्षा अधिक वर्षांपासून ही परंपरा कुंभार परिवारातर्फे करण्यात येत आहे.

कुंभार वाड्यात बुधवारी गणपती आणि सिद्धेश्वरांच्या प्रतिमाचे पूजन करून 5 दिवसाचे मानाचे दिवे बसवण्यात आले. यावेळी 56 मातीच्या घागरी पैकी प्राथमिक स्वरूपात 7 घागरींची यावेळी पूजा करण्यात आली. कुंभार वाड्यातील पुरुष मंडळींसह सुहासिनींच्या हस्ते हिरेहब्बू वाड्यात या घागरी सुपूर्द करण्यात आल्या. यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे महादेव कुंभार यांनी या घागरी सुपूर्द केल्या. 

सोलापूरच्या गड्डा यात्रेत करा दुबई सफारी, 'सेल्फी पॉईंट' ठरणार मोठं आकर्षण, Video

काय आहे घागरींचे महत्व?

मुख्य काठ्यांच्या उपस्थितीत 68 लिंगांना तैलाभिषेक सोहळा पार पडण्यासाठी या 56 घागरींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता हा मुख्य सोहळा कुंभारवाड्यात पार पडणार आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता मानकरी कुंभार यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा गणपती आणि सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचामृताने घागरीचे सुद्धा पूजन केले जाणार आहे. त्यानंतर नंदीध्वज मिरवणूक उत्तर कसब्यातील कुंभारवाड्या समोरून आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास खोबरे आणि लिंबूचे हार आणि बाशिंग बांधून विधिवत पूजा करण्यात येणार आहे.

सिद्धेश्वर मंदिराजवळील संमती कट्ट्याजवळ नदीजवळ यांचे आगमन झाल्यानंतर मानकरी कुंभार यांनी दिलेल्या सुगडीचे पूजन केले जाते. आणि या कुंभार परिवाराला मानाचा विडा दिला जातो. रविवारी सकाळी साडेसात वाजता होम कट्ट्यावरील लिंगांची विधिवत पूजा कुंभार यांच्याकडून केली जाते. त्यानंतर कुंभार कन्या माता कुमारव्वा देवीचे प्रतीकात्मक रूप तयार केले जाते. सदरच्या प्रतीकात्मक रूपात सिद्धेश्वर देवस्थान कडून मनी मंगळसूत्र आणि साडी दिली जाते. त्यानंतर होम विधीचा कार्यक्रम संपन्न होतो

Solapur : सोलापूरची ओळख असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास माहिती आहे का? Video

पूर्वापार चालत आलेली परंपरा

 पूर्वापार चालत आलेली परंपरा आम्ही पुढे चालू ठेवली आहे. ज्या पद्धतीने याची सर्व धार्मिक विधी पार पडते त्याच पद्धतीने मनोभावे ही सेवा करत आहोत. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदाची यात्रा सिद्धरामेश्वराच्या कृपेने चांगली होईल अशी भावना मानकरी महादेव मैत्री कुंभार यांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Local18, Solapur