सोलापूर, 11 जानेवारी : श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यातील कामगार या यात्रेमध्ये त्यांचे स्टॉल लावतात. त्याचबरोबर यावर्षीच्या यात्रेत दुबई सफारी हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
दुबई सफारीचा आनंद जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून ओळख असणारी दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीची प्रतिकृती गड्डा यात्रेत साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीची उंची 70 ते 80 फुट आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून सोलापूरकरांना गड्डा यात्रेत दुबई सफारीचा आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर इथं खास सेल्फी पॉईंटही उभारण्यात आला असून तो या यात्रेचं आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
सोलापूरची ओळख असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास माहिती आहे का? Video जादूचे खेळ आणि बरच काही दुबई सफारीसोबतच प्रसिद्ध जादूगार एसके सरकार यांचे कार्यक्रमही या यात्रेत आहेत. त्याचबरोबर मौत का कुवा, जंगल सफारी, पाळणे, रोलर कोस्टर हे नेहमीच्या यात्रेतील प्रकार यंदा अधिक भव्य आणि जास्त क्षमतेचे असतील. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना यात्रेचा आनंद घेता यावा म्हणून ही यात्रा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते.
‘मी परिवारातील सर्व सदस्यांसोबत उत्तर प्रदेश मधून यंदाच्या वर्षी आमचा स्टॉल लावण्यासाठी इथं आलो आहोत. कोरोना कालखंडात आम्ही हालाखीचे दिवस काढले. यंदाच्या वर्षी सर्व सोलापूरकरांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. आमच्या कुटुंबाला याचा आर्थिक फायदा होईल,’ अशी आशा स्टॉलचालक मोहम्मद हुसेन यांनी व्यक्त केली आहे.