जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / अमृतसरसारखं आणखी एक सुवर्णमंदिर; पण इतकं निराळं की देशात तसं दुसरं नाहीच

अमृतसरसारखं आणखी एक सुवर्णमंदिर; पण इतकं निराळं की देशात तसं दुसरं नाहीच

सूक्ष्म कोरीवकाम आणि सोनेरी भिंतींमुळे मंदिराचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.

सूक्ष्म कोरीवकाम आणि सोनेरी भिंतींमुळे मंदिराचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.

300 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यासाठी तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला. मंदिरात 1 इंच ते 6 इंचांपर्यंतच्या एकूण 163 मूर्ती स्थापित आहेत.

  • -MIN READ Local18 Gwalior,Madhya Pradesh
  • Last Updated :

विजय राठोड, प्रतिनिधी ग्वाल्हेर, 02 जुलै: ग्वाल्हेरच्या गालव ऋषींच्या तपोभूमीत वसलेल्या जैन सुवर्ण मंदिराबाबत आपण कधी ऐकलंय का? डीडवाना ओलीत 1704 साली बांधलेलं हे मंदिर म्हणजे ग्वाल्हेर कलेचं एक अद्वितीय उदाहरण आहे. त्याचं बांधकाम पाहण्यासाठी सर्वधर्मीय लोक दूरदूरहून येतात. महत्त्वाचं म्हणजे सोन्याचं नक्षीकाम असलेलं हे देशातील एकमेव जैन मंदिर आहे. 300 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यासाठी तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला. मंदिरात 1 इंच ते 6 इंचांपर्यंतच्या एकूण 163 मूर्ती स्थापित आहेत. या मूर्ती वास्तूकलेच्या दृष्टिकोनातूनही उत्कृष्ट आहेत. मंदिराच्या भिंती आणि छतावर सोन्याचं नक्षीकाम केलेलं आहे. या जाळीदार कोरीवकामासाठी 45 वर्ष लागली होती. मंदिराला आतापर्यंत 100 किलो सोन्याने पॉलिश करण्यात आलं आहे. 2015मध्ये 10 किलो सोन्याने मंदिराचा जीर्णोद्धार झाला. केवळ मूर्ती बनवण्यासाठीच कोट्यवधी रुपयांचं सोनं वापरण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सूक्ष्म कोरीवकाम आणि सोनेरी भिंतींमुळे मंदिराचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं, असं मंदिराच्या सचिव अंकिता पाटणी यांनी सांगितलं. मंदिरातील सर्व मूर्तींना सोन्यासह चांदी आणि विविध रत्न जडलेली आहेत. Weird Law : बायकोचा बर्थडे विसरणं कायद्याने गुन्हा; विश केलं नाहीत तर जेलमध्ये जाल दरम्यान, या मंदिराच्या बांधकामापेक्षा नक्षीकामासाठी अधिक वर्ष लागली, हेच मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. शिवाय मंदिरात अतिशय शांतता असून प्रसन्नमय वातारण असून दरवर्षी देश-विदेशातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात