मुंबई, 30 डिसेंबर : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून मेष राशीचं 2023 या वर्षासाठीचं महिनानिहाय भविष्य सांगितलं आहे. वृषभ (Aries) (एप्रिल 20 ते मे 20) जानेवारी सर्वसाधारण : एखादं आव्हान पुन्हा उभ ठाकू शकतं त्यामुळे अधिक शक्तीने तयार रहा. दैवदत्त संधीमुळे ऑफिसात प्रतिमा बळकटीला मदत होईल. दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळतील त्यामुळे सध्याची आर्थिक सोय होईल. पालकांनी विशेषत्वाने एखादी इच्छा बोलून दाखवली तर ती पूर्ण करण्यात अडथळे येतील. रिलेशनशिप : निर्णय घेतना अडचणी निर्माण होतील. तुमच्यावर मानसिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या व्यक्तीला तुमचं रूक्ष वागणं अनुभवाला येईल. त्यामुळे नीट बोला. करिअर : तुमच्या एखाद्या संकल्पनेला या आधी यश मिळालं नव्हतं तिला आता यश मिळण्याची शक्यता दिसते. निर्णय पटकन घेतले तर फायद्याचं ठरेल. लकी रंग : Deep Maroon फेब्रुवारी सर्वसाधारण : एखाद्या व्यक्तीला भेटून तुमची उत्सुकता चाळावेल. गैरसमज होण्याची शक्यता आहे किंवा पाठपुराव्याला उशीर होईल. तुमच्या निवडीप्रमाणे गोष्ट झाली नसल्यासारखं वाटेल. जुने छंद नव्याने जोपासाल. दुसऱ्याचं आयुष्य तुम्हाला प्रेरणा देईल. रिलेशनशिप : जगणं साधं ठेवा अडचणी कमी येतील. गमावलेला विश्वास कमावणं सोपं नाही. नवं ऑफिस, व्यक्ती इंटरेस्टिंग वाटेल. करिअर : दीर्घ कामासाठी सज्ज व्हा. तुम्ही दुर्लक्ष केलेली व्यक्ती मदतीला धावून येईल. एकूण स्थिर आणि शांत महिना जाईल. लकी रंग : Emerald Green मार्च सर्वसाधारण : एखादं नवं गुपित कळेल आणि तुम्हाला स्फूर्ती देईल. सध्या भागीदारी करू नका. तुमचे स्रोत आणि तुम्हाला मिळालेली साधनं यांचं तुम्ही कौतुक करायला हवं कारण प्रत्येकाला तशी साधनं मिळत नाहीत. हेकेखोर माणसाचा त्रास होईल. रिलेशनशिप : जोडीदाराचं विक्षिप्त वागणं त्रास देईल. आत्मपरीक्षण करा कदाचित तुम्ही निराश असाल. महिनाअखेरीला जोडीदार भेटवस्तू देऊन तुम्हाला चकित करेल. करिअर : भरपूर प्रवासाचे दिवस सुरू झालेत. क्वचित अडथळेही येतील. येणाऱ्या परिस्थितीचा तुम्ही चुकीचा अर्थ लावू शकाल. लकी रंग : Violet एप्रिल सर्वसाधारण : कुणीतरी जवळचं तुमच्या चुगल्या करेल. तुमच्या कल्पना मांडताना दोनदा विचार करा. राजकारण किंवा सरकारी नोकरीत असाल तर मोठा बदल संभवतो. वैयक्तिक कामातही लवकरच बदल होतील. आर्थिक आवक वाढेल. रिलेशनशिप : तुलनेनी शांत महिना आहे, क्वचितच जोडीदाराशी वाद होईल. एकटे असाल तर जवळच्या मित्राबद्दल प्रचंड आपुलकी वाटेल. संवाद हीच गुरुकिल्ली आहे. करिअर : गुंतवणूक, संपत्तीसंबंधी सगळं पेपरवर्क तयार ठेवा. मनातील भीती निघून जाईल. परदेशात कार्यविस्तार करू इच्छित असाल तर कामं आता होतील. लकी रंग : Canary Yellow मे सर्वसाधारण : उर्जा संतुलित राहतील. तुमच्या आवडीच्या लोकांशी भरपूर गप्पा मारायला आणि स्वत:चे लाड करायला या महिन्यात वेळ मिळेल. आक्रमकऐवजी विचारी पवित्रा फायद्याचा ठरेल. इतर जणं तुमच्याशी असलेली नाती सुधारण्याच्या प्रयत्नांत असल्यांच तुम्हाला जाणवेल. ऑफिसातील ज्येष्ठ अचानक निघून गेल्याने पोकळी जाणवेल. रिलेशनशिप : थोडा ब्रेक घेऊन नात्यात तुम्ही किति गुंतला आहात हे पाहण्याची गरज आहे. काही अत्यंत महत्त्वाचं नसेल तर अचानक जोडीदाराची साथ सोडू नका. तुमची प्रेमकथा जगजाहीर होईल. करिअर : येणाऱ्या संधी स्वीकारल्या नाहीत तर वाढ होणार नाही. तुम्ही जिथून सुरूवात केली होती त्या ठिकाणावरून एखादी संधी येण्याची शक्यता आहे. एखाद्या ज्येष्ठासमोर तुमचं मत मांडा. लकी रंग : White जून सर्वसाधारण : तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल आणण्यासाठी काही जुन्या मित्रांवर विश्वास ठेवू शकता. दिवस तुलनेने हळू पुढे सरकेल पण पूर्ण निवांत नसाल. साचलेली कामं करण्यात बराच वेळ जाईल. संध्याकाळी मनोरंजक असतील. ऑफिसातली सध्याची कामची पद्धत बदलण्याची निकड आहे. रिलेशनशिप : नात्यात गरजेपेक्षा जास्त गुंतलेले नाहीत ना हे तपासा. तुम्ही परदेशात लग्न केलं असेल तर काही काळ जुळवून घ्यावं लागेल. जुना जोडीदार अजूनही पाळत ठेऊन असेल. करिअर : थोडंस नियोजन दिवस पदरी पाडून देईल. तुमचा दृष्टिकोन सुधारायला सांगितला असेल तर त्यावर काम करा. नवं काम साद घालेल. लकी रंग : Beige जुलै सर्वसाधारण : सध्या स्वंयप्रेरित आहात. तुमच्या चुकीचा दोष दुसऱ्याला देणं चुकीचं आहे. तुमच्याबद्दलच्या जुन्या अनुभवांमुळे लोक तुमच्यावर अविश्वास दाखवू शकतात याचं भान ठेवा. ऑफिसातल्या चांगल्या बातमीने मूड मस्त होईल. गरजू व्यक्ती तुमच्याकडे मदत मागेल. रिलेशनशिप : ऑनलाईन भेटलेली नवी व्यक्ती आकर्षित करेल. तुम्ही आधीच भेटलेली एखादी व्यक्ती तुमच्यात इंटरेस्टेड असेल पण सांगायला लाजत असेल. जर विवाहित असाल तर तुम्हाला काही काळ स्वत:लाच सगळं करावं लागेल. करिअर : तुम्हाला हवंय ते मिळण्याची शक्यता धूसर आहे. चट्कन काम करून तुमच्यावर कुणीतरी छाप पाडू पाहतंय. मागे वळून पाहिल्यास उत्तरं मिळतील. लकी रंग : Tangerine ऑगस्ट सर्वसाधारण : अतिचिकित्सकपणामुळे येणाऱ्या चांगल्या गोष्टीची वाट लागू शकते. थोड्याथोडक्या गोष्टींत वाद घालू नका. मनाच्या शांतीसाठी ध्यान करा. ऑफिसात नवी आव्हानं दिसत असतील तर बॅकअपच्या तयारीला लागा. कुणा प्रभावी माणसाची गाठ पडेल. रिलेशनशिप : कुठलीच बातमी चांगली नसते. तुम्ही कायम सकारात्मक रहायला हवं. जुन्या प्रेमाच्या आठवणींत रमून जाल. करिअर : नियतीनुसार घटना घडू दे. एखादी अधिक पगाराची नोकरी मिळेल. नोकरी शोधत असाल तर मिळण्याची खूप शक्यता आहे. लकी रंग : Blue सप्टेंबर सर्वसाधारण : बरेच दिवस ज्याची आठवणही निघाली नव्हती ती व्यक्ती संपर्कात येईल. सध्या मित्रांमुळे मन रमेल. तुम्हाला कळालेल्या गोष्टीत किंचित सत्यता असेल. काही मौल्यवान हरवलं असेल तर ते लवकरच परत मिळेल. रिलेशनशिप : सध्या तुम्हाला वाटत नसेल पण लवकरच तुम्हाला कामातून एक ब्रेक घ्यावा असं वाटायला लागेल. स्नेहसंमेलनात एखादी व्यक्ती तुमच्यावर छाप पाडेल. जुन्या नात्यांची आठवण करून देणारं सरप्राईज मिळेल. करिअर : तुमच्यासोबत काम करू इच्छिणारी व्यक्ती तुम्हाला भेटेल. आत्मविश्वास वाढेल. तुमच्या ऑफिसचं प्रतिनिधीत्व करायला सज्ज व्हा. लकी रंग : Aquamarine Blue ऑक्टोबर सर्वसाधारण : आणखी काही दिवस प्रवास करावा लागेल. त्यातून नव्या कल्पना सुचतील. सध्या कामात व्यस्त असल्याने घरकामं मार्गी लावायला तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल. अवास्तव अपेक्षा करू नका. रिलेशनशिप : विरुद्धलिंगी आकर्षक व्यक्ती तुम्हाला आकर्षित करू शकते. बालपणीच्या ओळखीतली व्यक्ती वेगळ्याच पद्धतीने संपर्कात येईल. एखादं पत्र किंवा ई-मेलमुळे मनात आठवणींचं वादळ उठेल. करिअर : आर्थिक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी उत्तम काळ आहे. जुनी गुंतवणूक असेल तर चांगला परतावा देईल. छंदातून पैसे कमवू लागलात तर ते योग्यच आहे. लकी रंग : Purple नोव्हेंबर सर्वसाधारण : शक्यता आणि आशेच्या बळावर तुम्ही काम करत रहा. मार्ग न बदलता सातत्याने घेतलेलं काम करत रहा. जुनं कर्ज फेडलं पाहिजे. मित्रांचं स्नेहमीलन आयोजित कराल. रिलेशनशिप : कुणीतरी जवळचं तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेईल. तुम्हाला पोकळी जाणवेल पण ती तात्पुरती असेल. नवं कुणीतरी पुढे चालण्याचं बळ देईल. करिअर : मॅनेजमेंटमध्येच बदल होणार असल्याने तुमच्या भूमिकेतही सकारात्मक होईल. तुम्ही कंपनी बदलणार नसाल तर वाढीची संधी आहे. लकी रंग : Royal Blue डिसेंबर सर्वसाधारण : इतर गोष्टींकडे लक्ष द्याव लागणार असल्याने नित्याची कामं बाजूला ठेवा. आईला योग्य उपचार द्या. तुमच्या सभोवती आध्यात्मिक वातावरण जाणवेल. परदेशी पाहुणे लवकरच येण्याची शक्यता आहे. कुणा हृदयस्थ व्यक्तीचा मृत्यू संभवतो. रिलेशनशिप : चेहऱ्यावरून सगळं ठीकच वाटतं. पण खोट्यांमागच्या खऱ्या भावना ओळखण्यात तुम्ही प्रवीण व्हायला हवं होतं. मनात दबलेल्या भावना आधूनमधून डोकं वर काढतील. करिअर : ऑफिसात कुणीतरी त्रास देईल पण तुम्हाला त्यातून पुढे जायला हवं. तुम्हाला नव्या टीमसोबत काम करायला सांगितलं जाऊ शकतं. काही महत्त्वाच्या गोष्टींना उशीर होऊ शकतो. लकी रंग : लॅव्हेंडर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.