मुंबई, 29 जून: हिंदू धर्मात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हे चार महिने एकत्र करून चातुर्मास तयार होतो. देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, जो कार्तिकच्या देव प्रबोधिनी एकादशीपर्यंत चालतो. या काळात श्रीहरी विष्णू योगनिद्रामध्ये तल्लीन राहतात, म्हणून मांगलिक आणि शुभ कार्ये वर्ज्य आहेत. याच काळात आषाढ महिन्यात भगवान विष्णू वामनाच्या रूपात अवतरले होते. यावेळी चातुर्मास 29 जून ते 23 नोव्हेंबरपर्यंत असेल. संकटांपासून मुक्तीसाठी देवशयनी एकादशीला करा हे उपाय, राशीनुसार दानाचे महत्त्व चातुर्मासात कोणाची पूजा केली जाते? चातुर्मासाचे चार महिने हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. आषाढ महिन्याच्या शेवटच्या काळात भगवान वामन आणि गुरुपूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद सहज प्राप्त होतात. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदात होतो आणि त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. अश्विन महिन्यात देवी आणि शक्तीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू पुन्हा जागृत होतात आणि संसारात शुभ कार्ये सुरू होतात. मनोकामना करायच्या पूर्ण? देवशयनी एकादशीला राशीनुसार अवश्य करा ‘या’ मंत्रांचा जप चातुर्मासात भोजनाचे नियम चातुर्मासात एकच वेळा जेवण घेणे उत्तम मानले जाते. या चार महिन्यांत तुम्ही जेवढे सात्विक राहाल, तेवढे चांगले होईल. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा. शक्य तितके आपले मन भगवंत भक्तीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी कोणी पाळले होते देवशयनी एकादशीचे व्रत? प्रेरणादायी पौराणिक कथा चातुर्मास पूजेचे नियम आषाढ पौर्णिमेला गुरूची पूजा करावी. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील. श्रावणामध्ये भगवान शिवाची पूजा करा. यामुळे वैवाहिक जीवन, सुख आणि दीर्घायुष्य लाभेल. भाद्रपदात श्रीकृष्णाची पूजा करावी. हे संतती आणि विजयाचे वरदान देईल. अश्विनमध्ये देवी आणि श्रीरामाची पूजा करा. यामुळे विजय, शक्ती आणि आकर्षणाचे वरदान मिळेल. कार्तिकमध्ये श्रीहरी आणि तुळशीची पूजा केली जाते. यातून राज्य सुख आणि मुक्ती-मोक्षाचे वरदान मिळते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.