मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दरमहा EPF मध्ये पैसे जमा होत असतील मिळू शकेल 1.5 कोटींपेक्षा अधिकचा फायदा, वाचा सविस्तर

दरमहा EPF मध्ये पैसे जमा होत असतील मिळू शकेल 1.5 कोटींपेक्षा अधिकचा फायदा, वाचा सविस्तर

ईपीएफसाठी (Employee Provident Fund) साठी पगारातून होणारी कपात भविष्यात तुम्हाला मोठा फंड उभा करण्यास मदत करेल, अर्थात तुम्ही पीएफमधील (PF Account) पैसे मध्येच काढले नाहीत तर.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: प्रत्येक महिन्यातील पगाराचा दिवस अनेकांसाठी आनंदाचा दिवस असतो. मात्र सॅलरी स्लिपमधील होणारे डिडक्शन पाहून अनेकांचा हिरमोड होतो. मात्र यापैकी कापले जाणारे काही पैसे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अगदी तुम्ही दीर्घकाळासाठी नोकरी केली तर हे डिडक्शन तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. ईपीएफसाठी (Employee Provident Fund) साठी पगारातून होणारी कपात भविष्यात तुम्हाला मोठा फंड उभा करण्यास मदत करेल, अर्थात तुम्ही पीएफमधील (PF Account) पैसे मध्येच काढले नाहीत तर.

EPF मधील फंडवर आर्थिक वर्षासाठी सध्या 8.5 टक्के दराने व्याज मिळते आहे. हा व्याजदर अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) आणि सरकारी बचत योजनांपेक्षा (Saving Schemes) अधिक आहे. या व्याजदराने 25,000 रुपये बेसिक सॅलरी असणाऱ्या व्यक्तीच्या पीएफमध्ये जवळपास 1.65 कोटी रुपये जमा होऊ शकतात. EPF वर मिळणारं व्याज टॅक्स फ्री असतं. या फंडमध्ये एम्प्लॉयरकडून देखील सारखं योगदान दिलं जातं.

हे वाचा-Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द?

तुम्हाला ईपीएफ इनव्हेस्टमेंटमधून एक कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी हे सुनिश्चित करावं लागेल की तुम्ही निवृत्तीपर्यंत कोणतीही रक्कम पीएफ खात्यातून काढली नाही आहे. नोकरी सुरू केल्यानंतर पाच वर्षांच्या आतमध्ये EPF मधून पैसे काढल्यास टॅक्स द्यावा लागतो.

Finology चीफ इनव्हेस्टमेंट ऑफिसर प्रांजल कामरा यांच्या मते, देशामध्ये अॅव्हरेज इन्फ्लेशन दीर्घ कालावधीमध्ये 6 टक्के आणि EPF वर व्याज जवळपास 8.5 टक्के असल्यास निवृत्तीनंतर चांगला फंड मिळतो. संपत्ती ही दीर्घकाळाने बनते आणि चांगला फंड बनवण्यासाठी EPF मधून सुरुवातीच्या काळात पैसे काढले नाही पाहिजेत. प्रोव्हिडेंट फंडमध्ये जमा असणाऱ्या रकमेवर कर्मचाऱ्यांना कर्जाची सुविधा देखील मिळते. मात्र हे कर्ज काही विशेष कारणांसाठीच घेता येते.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, PF Withdrawal