नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी (Gold Price) चांगली बातमी आहे. सोन्यामध्ये सातत्याने घसरण होत आहे. आज बुधवारी (4 August 2021) सोन्यामध्ये (Gold Price Today) काही विशेष मागणी पाहायला मिळाली नाही. सोन्यामध्ये व्यवहार स्थिर राहिला आहे. भारतीय वायदे बाजारात अलीकडेच कमजोरीची परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्याचे दरही कमी होताना दिसत आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याची वायदे किंमत ₹47935 प्रति तोळावर ट्रे़ड करत आहे. तर चांदीची वायदे किंमत 0.34% ने वाढून ₹68145 प्रति किलो झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.48 टक्क्यांनी कमी झाले होते. तर चांदीही 0.1 टक्क्यांनी उतरली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. स्पॉट गोल्डची किंमत 1,809.21 डॉलर प्रति औंस तर चांदीची किंमत 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 25.50 डॉलर प्रति औंस झाली आहे. हे वाचा- Post Office: या योजनेतून मिळवा दुप्पट पैसे,5 लाखांची गुंतवणूक मिळवून देईल 10 लाख रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 8200 रुपयांनी सोनं स्वस्त गेल्यावर्षीच्या तुलनेत पाहायला गेलं तर सोनं 8200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्यामध्ये झालेली ही घसरण अस्थायी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना या घसरणीकडे एक संधी म्हणून पाहणं आवश्यक आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते या किंमती लवकरच बदलतील, आणि दर वाढून ₹48,500 प्रति तोळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे वाचा- करदात्यांना दिलासा! CBDT ने वाढवली ITR इलेक्ट्रॉनिक फायलिंगची डेडलाइन महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर वेबसाइट गुड रिटर्न्सच्या मते, बुधवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 420 रुपयांनी कमी झाल्यामुळे 46,960 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदी कालपेक्षा 250 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 67,600 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. प्रत्येक राज्यात उत्पादन शुल्क, राज्यातील कर आणि मेकिंग चार्जेनुसार सोन्याची किंमत वेगवेगळी असते. नवी दिल्लीमध्ये 47,050 रुपये प्रति तोळा दराने सोन्याची विक्री होत आहे. तर या वेबसाइटच्या मते मुंबईमध्ये दर 46,960 रुपये प्रति तोळा आहे. तर चेन्नईमध्ये हा दर 45,330 रुपये प्रति तोळा आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.