नवी दिल्ली, 04 सप्टेंबर: स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईत ते शक्य होतंच असं नाही. जर तुम्ही देखील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda Mega E Auction) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घरखरेदीची संधी मिळेल. BoB कडून काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. 8 सप्टेंबर रोजी तुम्ही स्वस्तात घरखरेदी करू शकता (Residential Property). याकरता तुम्हाला बँकेच्या ई-लिलावात बोली लावावी लागेल. प्रॉपर्टी संबंधात सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://ibapi.in/ किंवा www.bankofbaroda.in या साइट्सवर भेट देऊ शकता. शिवाय तुम्ही जवळच्या बँक शाखेत जाऊनही याबाबत माहिती मिळवू शकता. हे वाचा- Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 47 हजारांपार, चांदीला मात्र झळाळी बँकेने ट्वीट करत दिली माहिती बँक ऑफ बडोदाने ट्वीट करत या लिलावाबाबत माहिती दिली आहे. बँकेने यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, बँक ऑफ बडोदा तुम्हाला स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी देत आहे. या सुपर मेगा ई-ऑक्शनमध्ये घर, फ्लॅट, ऑफिस स्पेस, प्लॉट, औद्योगिक आणि कृषीसह सर्व प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव केला जाईल. हा लिलाव 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Get ready to fulfil your dream of buying a property. #BankofBaroda presents mega e-auction of properties across India on 8th September, 2021. Know more https://t.co/ejge3HE0ms pic.twitter.com/A5OfdEcMfN
— Bank of Baroda (@bankofbaroda) September 3, 2021
बँकांकडून वेळोवेळी आयोजित केला जातो लिलाव ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. अशाप्रकारच्या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात. कशाप्रकारे कराल रजिस्ट्रेशन? »बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. eBkray पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ सेक्शनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल. » यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो. हे वाचा- आज इंधनाचे दर उतरले की वधारले? इथे तपासा पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट भाव »E-Auction प्लॅटफॉर्मवर जनरेट झालेल्या चालानचा वापर करुन अमाउंट ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी NEFT किंवा ऑनलाईन-ऑफलाईन ट्रान्सफरचाही वापर करता येऊ शकतो. »इच्छुक रजिस्टर करणारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात