मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 47 हजारांपार, चांदीला मात्र झळाळी

Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 47 हजारांपार, चांदीला मात्र झळाळी

Gold Price Today

Gold Price Today

सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचा दर आज किरकोळ 80 रुपयानी कमी झाला आहे. तरी दखील सोन्याचे दर 47000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 04 सप्टेंबर: सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचा दर आज किरकोळ 80 रुपयानी कमी झाला आहे. तरी दखील सोन्याचे दर 47000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. आजच्या घसरणीनंतर सोन्याचे दर 47,200 रुपये प्रति (Gold Rates) तोळा आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटने (Good Returns) जारी केलेल्या किंमतीनुसार हे आजचे सोन्याचे दर आहेत. दरम्यान सोन्याच्या उलट परिस्थिती चांदीमध्ये पाहायला मिळाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटन दिलेल्या माहितीनुसार चांदीचे दर (Silver Price Today) वधारले आहेत. चांदीच्या किंमतीत (Silver Rates) आज 100 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर प्रति किलो 63,600 रुपये झाले आहेत. शुक्रवारच्या दरापक्षा चांदीच्या किंमतीत आज 100 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

हे वाचा-मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी गुंतवणार 75000 कोटी

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today