मुंबई, 09 जुलै: मुंबईतील दिंडोशी परिसरातील एका एटीएम मशीनवर (ATM) दरोडा (Robbery) टाकण्याच्या बेतात असणाऱ्या आरोपींचा डाव मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उधळून लावला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला रंगेहाथ पकडलं (1 Arrest) आहे. तर अन्य दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. एटीएम मशीन रुममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) सर्विलान्समुळे पोलिसांनी दरोडेखोरांचा कट उधळून लावला आहे. दरम्यान एक आरोपी एटीएम बाहेर पहारा देण्यासाठी थांबला होता. तर दोनजण एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत होते.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दिंडोशी भागातून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरू केला आहे. संबंधित घटना 3 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की तीन आरोपी एकामागून एक एटीएम रुममध्ये शिरून मशीन फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा-धक्कादायक! अनैतिक संबधातून रचला कट; 6जणांनी घरात घुसून विवाहित महिलेला पाजलं विष
एटीएम तोडणार्यांपैकी एकजण सतत बाहेर जाऊन कोणी येतंय का याची निगरानी ठेवत आहे. तर अन्य दोन आरोपी एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु एटीएम मशीनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्विलान्स यंत्रणेमुळे याची माहिती हैदराबादस्थित बँकेच्या कन्ट्रोल रुमला मिळली. हैदराबाद येथील कन्ट्रोल रुमनं त्वरित दिंडोशी पोलिसांशी संपर्क साधून दरोड्याची माहिती दिली.
VIDEO: मुंबईतील ATM फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न हैदराबादेतून हानून पाडला pic.twitter.com/e1F4q3Qnp3
— The मराठी Medium (@MarathiMedium) July 9, 2021
हेही वाचा-रात्री 11.30 वा. अपहरण, 3 वेगवेगळ्या गावी 7 जणांनी मुलीवर केला गँगरेप
काही दरोडेखोर दिंडोशी परिसरातील एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, तातडीनं दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याचं दिसताच, आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला पाठलाग करून ताब्यात घेतलं आहे. अशाप्रकारे मुंबईतील दरोडा हैदराबाद येथून रोखला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Robbery