पुणे, 9 जून, वैभव सोनवणे : पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयानं पुणे पोलिसांनी काही दिवसापूर्वी अटक केलेल्या तरुणाला अखेर पुणे सत्र न्यायालयानं जामीन दिला आहे. भारतीय आई आणि पाकिस्तानी वडिलांच्या विभक्त होण्याच्या निर्णयानं मुलाची सुरू झालेली ससेहोलपट अद्यपही सुरूच आहे. आई-वडिलांचा घटस्फोट काही वर्षांपूर्वी पुणे येथील तरुणीचे पाकिस्तानी तरुणाशी लग्न झाले. ते दोघेही नातेवाईक त्यामुळे त्यांनी लग्न करून दुबईत संसार थाटला. तीन मुले झाली. मात्र, काही कारणाने आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तिन्ही मुले पुण्यात आजीकडे आली. येथे शाळेत शिकू लागली. मात्र दुर्दैवाने आजीचं निधन झाल्याने ती मुले पुन्हा निराधार झाली. त्यामुळे मुलांनी खटपट करून आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जाताना पाकिस्तानी रहिवासी असल्याची कागदपत्र पुणे पोलिसांनी पाहिली आणि तत्काळ या तरुणाला अटक केली. Crime News : मित्रांसोबतची ती पार्टी ठरली शेवटची; तरुणीचा भयानक मृत्यू, घटनेनं नवी मुंबईत खळबळ …तरीही तुरुगांत दरम्यान अटक करून वेळेत चार्जशीट न दाखल केल्यानं न्यायालयाने संबंधित तरुणाला जामीन मंजूर केला आहे. पण जामिनाची पूर्तता करण्यासाठी लागणारी कागदपत्रे नातेवाईकांकडे नसल्याने हा तरुण अजूनही कारागृहातच अडकून पडला आहे. आईवडिलांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे तीन मुलांच भविष्य टांगणीला लागलं आहे. त्यात हे तरुण कागदपत्रांची पूर्तता करू शकत नसल्यानं प्रश्न अधिक गुतांगुतीचा बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.