नवी मुंबई, 9 जून, प्रमोद पाटील: नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्टीसाठी मित्रांसोबत आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा इमरतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन मित्रांना तब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेलापुरातील सेक्टर 15 मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीदरम्यान सातव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
विरोधकांना फसवण्यासाठी बायकोवर झाडली गोळी, नंतर त्याच्यासोबतही घडलं भयानक!दोघांना घेतलं ताब्यात गुरुवारी सकाळी मृत तरुणीच्या मित्राने त्याच्या मित्राला घरी बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला होता. घरीच बियर आणल्या, मात्र तरुणी आणि तरुणीच्या मित्राने घरी नको म्हणून बाहेर जाऊन पार्टी करण्याचा प्लॅन आखला. प्लॅननुसार ते बेलापूर मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेले, तीथे पार्टीला सुरुवात झाली. पार्टी सुरू असतानाचा मृत मुलीचा मित्र लघुशंकेसाठी बाजूला गेला. ही मुलगी देखील त्याच्या मागे आली, आणि पाय घसरून खाली पडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुलीनेही बियर पिली असावी त्यामुळे ती पाय घसरून पडल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून, ही मुलगी खरच पाय घसरून पडली की, या मागे काही घातपात आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.