शरद पवारांचं बारामती हादरलं! विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात वयोवृद्धाची आत्महत्या

शरद पवारांचं बारामती हादरलं! विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात वयोवृद्धाची आत्महत्या

शहरातील विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात ही धक्कादायक घटना घडली

  • Share this:

बारामती, 7 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचं होमटाऊन असलेल्या बारामती शहरात (Baramati City) विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात एका वयोवृद्ध व्यक्तीनं आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील वनवे मळा परिसरातील विठ्ठल मंदिरात शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. काशीनाथ उर्फ नाना वनवे वय-60) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. काशीनाथ वनवे हे माळकरी सांप्रदायिक असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा...शिवसेना रुग्णवाहिकेच्या चालकाला लुटणाऱ्या महिलेचा 'प्रताप' ऐकून पोलिसही थक्क

मिळालेली माहिती अशी की, बारामती शहरातील वनवे मळा येथे शनिवारी काशिनाथ सीताराम वनवे यांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. काशिनाथ वनवे यांचे स्वतःचं विठ्ठल मंदिर होतं. ते नेहमीप्रमाणे सकाळ- संध्याकाळ या मंदिरात पूजाअर्चा करत होते. परंतु सायंकाळी त्यांनी याच मंदिराच्या गाभाव्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. काशिनाथ वनवे यांच्या आत्महत्या करण्यामागील कारण आद्याप समजलं नाही. पोलिसांनी काशिनाथ वनवे यांचा मृतदेहाचा पंचनामा असून पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे.

मंदिर बंद असल्यानं उचलंल पाऊल..?

 राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद आहेत. काशिनाथ वनवे यांनी याच कारणामुळे तर आत्महत्या केली नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.

राज्य सरकारनं अनलॉकमध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, काही अंशी मुंबई लोकलसेवा सुरु केली आहे. तरी राज्यातील मंदिरे अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरं सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतर राज्यपालांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. मात्र, मंदिरे उघडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका जास्त आहे, हे कारण पुढे करत राज्य सरकारने अद्याप मंदिरे खुली केलेली नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या तुषार भोसले यांनी मंदिरांचे कुलूप तोडण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा....दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे मुख्यंमत्र्यांचे निर्देश, सर्व शिक्षकांची होणार COVID चाचणी

दरम्यान, राज्य सरकारकडून दिवाळीनंतर मंदिरे खुली करण्याचा विचार करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील संकेत दिले होते. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पण थोडा हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकते, असेही आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 7, 2020, 7:02 PM IST

ताज्या बातम्या