पिंपरी, 11 ऑगस्ट: पिंपरी परिसरातील डिलक्स चौकात एका टोळक्याकडून तरुणाची हत्या (Murder in Pipari) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पिंपरीतील माजी शहराध्यक्षासह दोघांना अटक (Former City chief arrest) केली आहे. वेडा म्हटल्याच्या कारणातून वाद उफळला, त्यानंतर टोळक्यानं काठीनं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानं संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता आरपीआयच्या (RPI) (आठवले गट) माजी शहराध्यक्षाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
मनोज राजू कसबे असं हत्या झालेल्या 25 वर्षीय युवकाचं नाव असून तो पिंपरीतील मिलिंदनगर परिसरात वास्तव्याला होता. आरोपींच्या टोळक्याकडून मनोजला वारंवर वेडा म्हणून चिडवलं जात होतं. याच रागातून मनोजनं टोळक्याच्या अंगावर धावून जात त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असता, टोळक्यानंच मनोजला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यातच मनोजचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-मस्करीत 'ये लंबू' म्हटलं अन् मित्राने चाकूने भोसकून केली मित्राची हत्या
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय- 40), शौकत समीर शेख (वय- 32) अशा दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी पिंपरीतील मिलिंदनगरातील रहिवासी आहे. या मारहाण प्रकरणात पिंपरी शहरातील आरपीआयच्या माजी शहराध्यक्षाचं नाव देखील समोर आलं आहे. यानंतर पोलिसांनी पिंपरीतील आरपीआयचे माजी शहराध्यक्ष चिम्या उर्फ सुरेश निकाळजे (Suresh Nikalje arrest) याला अटक केली आहे.
हेही वाचा-मोठी बातमी: भाजप नेत्याला जिवंत जाळलं
मनोज राजू कसबेच्या हत्येप्रकरणात अद्याप माजी शहराध्यक्षासह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर मनोज जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल आणि त्यांचे अन्य साथीदार अद्याप फरार आहेत. संबंधित आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. केवळ वेडा म्हटल्याच्या कारणातून हा वाद उफाळून एका तरुणाची हत्या झाल्यानं, परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Pimpari