मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पिंपरी: दसऱ्याच्या दिवशीच साधला मुहूर्त; कामगाराने ज्वेलर्सच्या दुकानातील एक कोटींचं लुटलं सोनं

पिंपरी: दसऱ्याच्या दिवशीच साधला मुहूर्त; कामगाराने ज्वेलर्सच्या दुकानातील एक कोटींचं लुटलं सोनं

Crime in Pimpri: ऐन दसरा सणाच्या दिवशीच एका कामगाराने ज्वेलर्सच्या दुकानातील तब्बल 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांचे (gold theft worth Rs 1 crore) दागिने लंपास केले आहेत.

  • Published by:  News18 Desk
पिंपरी, 16 ऑक्टोबर: ऐन दसरा सणाच्या दिवशीच एका कामगाराने ज्वेलर्सच्या दुकानातील तब्बल 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांचे दागिने लंपास (Worker looted gold worth Rs 1 crore) केले आहेत. आरोपी कामगाराने ऐन दसरा सणाच्या मुहूर्तावर एवढी जबरी चोरी केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीची घटना उघडकीस येताच, ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने त्वरित चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत. मुकेश तिलोकराम सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या 30 वर्षीय कामगाराचं नाव आहे. तो चिखली परिसरातील मोरेवस्तीवरील रहिवासी आहे. पण त्याचं मुळगाव राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आहे. आरोपी सोलंकी हा चिखली येथील श्री महावीर ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीनं दुकानातील तब्बल 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हेही वाचा-पुणे: विकृताने महिला डॉक्टरच्या संसारात कालवलं विष; NUDE होण्यास भाग पाडलं अन्.. याप्रकरणी श्री महावीर ज्वेलर्सचे मालक जितेंद्र अशोक जैन (वय-35, रा. निगडी) यांनी शनिवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन यांचं चिखली येथील कृष्णानगर चौकात श्री. महावीर ज्वेलर्स नावाचं दुकान आहे.  तर आरोपी मुकेश सोलंकी हा या ज्वेलर्सच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. हेही वाचा-'सोबत जगता नाही आलं तर सोबत मरू', नाशकात प्रेमीयुगुलानं उचललं भयावह पाऊल दरम्यान, फिर्यादीने ग्राहकांना दाखवण्यासाठी काही दागिने आरोपी सोलंकीकडे दिले होते. यामध्ये 1396  ग्रॅम सोन्याचं मिनी गंठण, 1100 ग्रॅम सोन्याचं नेकलेस आणि राणीहार असलेला बॉक्स असा मुद्देमाल आरोपीनं लंपास केला आहे. यावेळी आरोपी साक्षीदार थानाराम घिसाराम चौधरी यांनी दिलेली 10 हजार रुपये किमतीची दुचाकी घेऊन फरार झाला आहे. आरोपीनं ऐन दसऱ्याच्या दिवशी मालकाच्या दुकानात डल्ला मारल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Gold robbery, Pimpari, Pune

पुढील बातम्या