मराठी बातम्या /बातम्या /nashik /'सोबत जगता नाही आलं तर सोबत मरू', नाशकात अल्पवयीन प्रेमीयुगुलानं उचललं भयावह पाऊल

'सोबत जगता नाही आलं तर सोबत मरू', नाशकात अल्पवयीन प्रेमीयुगुलानं उचललं भयावह पाऊल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Nashik: नाशकात एका अल्पवयीन प्रेमीयुगुलानं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला (minor lovers attempt to commit suicide by drinking poison) आहे.

नाशिक, 16 ऑक्टोबर: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव देवळा येथे एका अल्पवयीन प्रेमीयुगुलानं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला (minor lovers attempt to commit suicide by drinking poison) आहे. प्रेमाची गावात झालेली वाच्यता आणि अल्पवयीन असल्याने लग्न करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या एका प्रेमी युगुलानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. देवळा मालेगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह प्रेमी युगुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करणारा अल्पवयीन मुलगा आणि मुलगी देवळा येथील रहिवासी आहेत. मागील काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. पण अलीकडेच त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती गावातील नागरिकांना कळाली होती. प्रेमसंबंधाची वाच्यता झाल्यानंतर बदनामी टाळण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. पण दोघंही अल्पवयीन असल्याने लग्न करण्यातही अडचणी आल्या.

हेही वाचा-बर्थ डे पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार; एम्समधील वरिष्ठ डॉक्टरचं कृत्य

यामुळे दोघंही गेल्या काही दिवसांपासून नैराश्याचा सामना करत होते. अशातच दोघांनी एकत्रित आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघांनी मालेगाव देवळा रोडवरील वेलकम हॉटेलमध्ये रुम बुक केली. याच खोलीत दोघांनी विषारी तणनाशक औषध प्राशन केलं. काही वेळाने दोघांनी विष प्राशन केल्याचं एका हॉटेल कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं. ही घटना उघडकीस येताच हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली.

हेही वाचा-कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; 7 वर्षांनी सांगितली आपबीती

यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्थानिक रुग्णालयात उपचासाठी दाखल केलं. पण दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मुलाला मालेगावातील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर मुलीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी संबंधित हॉटेलच्या मॅनेजरसहीत प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Nashik, Suicide attempt