जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / देव तारी त्याला कोण मारी! ट्रकनं उडवलं तरीही महिला वाचली, पुण्यातील अपघाताचा थरारक video

देव तारी त्याला कोण मारी! ट्रकनं उडवलं तरीही महिला वाचली, पुण्यातील अपघाताचा थरारक video

पुण्यात भीषण अपघात

पुण्यात भीषण अपघात

पुण्यामधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमेंट ट्रकनं एका महिलेला उडवलं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 28 जुलै, चंद्रकांत फुंदे : पुण्यामधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमेंट ट्रकनं एका महिलेला उडवलं आहे, या अपघातामध्ये ही महिला जखमी झाली आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर हा अपघात झाला. विशेष म्हणजे एवढ्या भीषण अपघातानंतर देखील ही महिला जागेवर उठून बसल्याचं पहायला मिळालं. रोड ओलांडताना अपघात   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर एक रस्ता आहे. हा रस्ता ओलांडताना सिमेंट ट्रकनं एका महिलेला उडवलं. ऐन सिग्नल सुटण्याच्या वेळेस ही महिला झेब्राक्रॉस वरून पुढे जात होती. याचवेळी तिच्या दिशेन येणाऱ्या सिमेंट ट्रकरनं तीला जोरदार धडक दिली. तरीही अपघात झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं नाही.

जाहिरात

दरम्यान हा सिमेंट ट्रक पुढे गेल्यानंतर ही महिला जागेवर उठून बसली. त्यानंतर अपघातस्थळी असलेल्या लोकांनी या महिलेला रस्त्याच्या बाजुला आणलं. ठोंबरे असं या महिलेचं आडनाव असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये ठोंबरे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अपघाताचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात