मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात पीएमपी बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू; 4 महिन्यांनी बसचालकाचा कांड उघड

पुण्यात पीएमपी बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू; 4 महिन्यांनी बसचालकाचा कांड उघड

Road Accident: चार महिन्यांपूर्वी पुण्यातील (Pune) पीएमपी बसमधून (PMP Bus) प्रवास करणाऱ्या एका महिलेचा दरवाजातून खाली पडल्यानं (fall down from bus) दुर्दैवी मृत्यू (Woman death) झाला होता.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 28 जुलै: चार महिन्यांपूर्वी पुण्यातील (Pune) पीएमपी बसमधून (PMP Bus) प्रवास करणाऱ्या एका महिलेचा दरवाजातून खाली पडल्यानं (fall down from bus) दुर्दैवी मृत्यू (Woman death) झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण घटनेच्या चार महिन्यांनतर पोलिसांनी या घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी संबंधित पीएमपी बस चालकाविरुद्ध (PMP bus driver) गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात (Accident) झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेचा  पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

महादेवी गोरख गायकवाड असं बसमधून खाली पडून मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. 29 मार्च 2021 रोजी मृत महादेवी या पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. वडकी गावाच्या हद्दीतील धनलक्ष्मी वजन काट्याजवळील स्टॉपवर त्यांना उतरायचं होतं. त्यामुळे उतरायचं असल्याचं सांगत महादेवी या बसच्या दारात येऊन उभ्या राहिल्या. दरम्यान चालकानं बसचा दरवाजा देखील उघडा ठेवला होता.

हेही वाचा-पुण्यात भररस्त्यात मायलेकराला टोळक्याकडून दांडक्यानं मारहाण; धक्कादायक कारण समोर

धनलक्ष्मी वजन काट्याजवळील बस थांब्यावर बस आल्यानंतर महादेवी यांनी बसमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण चालकानं तशीच बस पुढे पळवली. यामुळे महादेवी यांचा तोल गेला आणि त्या बसमधून खाली पडल्या. रस्त्यावर जोरात आदळल्यानं महादेवी गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र पोलीस तपासात पीएमपी चालकाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.

हेही वाचा-आजीला सांगून स्नेहा किचनमध्ये गेली अन् परत आलीच नाही, देहूरोडमधील दुर्दैवी घटना

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पीएमपी बस चालक प्रवीण शिवाजी कड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं बस थांबवायला सांगूनही बस न थांबवल्यानं हा अपघात झाला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Death, PMPML, Pune accident