पुणे, 27 जुलै: पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) परिसरात एका किरकोळ कारणातून मायलेकराला (Son and mother) बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं पीडित मायलेकराला शिवीगाळ (Abuse) करत मारहाण केली आहे. या हल्ल्यात दोघा मायलेकांना चांगलीच दुखापत झाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणानं हडपसर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. हडपसर पोलिसांनी अद्याप या गुन्ह्यात कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.
गणेश डोंगरे असं मारहाण झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो हडपसर परिसरातील गाडीतळ येथील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास फिर्यादी गणेश आपल्या आईसोबत तुळजाभवानी वसाहतीसमोरील रस्त्यावरून जात होता. दरम्यान गणेशचा आरोपी तरुणाला धक्का लागला. या किरकोळ कारणातून राग आल्यानं आरोपी तरुणानं आपल्या काही साथीदारांना बोलवून घेतलं. आणि गणेशला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा-औषध असल्याचं सांगत बापानं पोटच्या मुलाला पाजलं विष; नगरमधील धक्कादायक घटना
आपल्या मुलाला होणारी मारहाण पाहून फिर्यादी तरुणाची आई मध्यस्थी करण्यासाठी भांडणांत पडली. पण संतापलेल्या तरुणांनी दोघां मायलेकराला लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. भररस्त्यात मारहाण झाल्यानं परिसरात अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. मारहाण केल्यानंतर संबंधित आरोपींनी पीडित तरुणाला धमकावत घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर पीडित तरुणानं हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा-पाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beating retreat, Crime news, Pune