मराठी बातम्या /बातम्या /पुणे /हद्द झाली! बापट यांच्या निधनानंतर 48 तासांत भावी खासदाराचं बॅनर, भाजप नेता ट्रोल

हद्द झाली! बापट यांच्या निधनानंतर 48 तासांत भावी खासदाराचं बॅनर, भाजप नेता ट्रोल

गिरीश बापट

गिरीश बापट

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं बुधवारी निधन झालं. त्यांचं निधन होऊन दोन दिवस होत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 1 एप्रिल : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं बुधवारी निधन झालं. त्यांचं निधन होऊन दोन दिवस होत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नाही तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेच पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे 'भावी खासदार' म्हणून बॅनर लागलेत. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. प्रचंड टीका होऊ लागल्यानंतर हे बॅनर अखेर  हटवण्यात आले आहेत.

बॅनरवरून टीकेची झोड 

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं बुधवारी निधन झालं. त्यांचं निधन होऊन तीन दिवसही होत नाहीत, तोच पुण्यात  भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचं बॅनर लावल्याचं पहायला मिळालं. या बॅनरवर मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. या बॅनरवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर हे बॅनर हटवण्यात आले आहेत.

पोटनिवडणूक बिनविरोध होणार 

बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. आता या मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, पोटनिवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे. आम्ही उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरं जाऊ. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांना याबाबत विचारले असता या निवडणुकीवर लगेच बोलणं योग्य होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Pune