प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 10 मे : कोणत्याही ऋतूमध्ये, दिवसाच्या कोणत्याही वेळी चहाप्रेमींना चहा लागतोच. या चहात आलं टाकलं असेल तर मग विचारायलाच नको. बहुतेकांचा दिवस त्याशिवाय सुरू होत नाही आणि संपतही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दिवसातून अनेकवेळा चहा हवा असतो. मात्र, आता हाच आल्याचा चहा आता घाम फोडणार आहे. जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात किंवा चटणीमध्येही बऱ्याचदा आल्याचा वापर होतो. आले वापरणाऱ्या आणि चहापासून ते चटणीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आलं आवडणाऱ्या सर्वांसाठी मोठी बातमी आहे. मसालेदार भाज्यांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात 200 रुपये किलो दरानं आलं विकलं जातंय. गेल्या काही दिवसांमध्ये हे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
चहा विक्रेत्यांवर परिणाम आल्याचे भाव वाढल्यानं त्याचा चहा विक्रेत्यांवर काय परिणाम झाला हे आम्ही पुण्यातील काही विक्रेत्यांकडून जाणून घेतले. त्यावेळी दर वाढवल्यानं आलं चहामध्ये कमी वापरावं लागत, असं त्यांनी म्हंटलं. महागाईमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं आम्हाला काही पर्याय उरला नसल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. आल्याला का आला सोन्याचा भाव? शेतकरी राजा खूश पण बाजारात नेमकं घडलं काय? Video तर, पुणेकरांनीही या भाववाढीवर नाराजी व्यक्त केलीय. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या खिशाला कात्री बसलीय. आता बहुतेक चहा विक्रेत्यांनी चहामध्ये आलं टाकणं बंद केलंय. आलं टाकलेला चहा अगदी कमी ठिकाणी मिळतो, अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिलीय.