जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आल्याला का आला सोन्याचा भाव? शेतकरी राजा खूश पण बाजारात नेमकं घडलं काय? Video

आल्याला का आला सोन्याचा भाव? शेतकरी राजा खूश पण बाजारात नेमकं घडलं काय? Video

आल्याला का आला सोन्याचा भाव? शेतकरी राजा खूश पण बाजारात नेमकं घडलं काय? Video

रोजच्या जेवणात लागणारं आलं सध्या चांगलंच महाग झालं आहे. हे दर वाढण्याची कारणं काय आहेत?

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 9 मे :  आल्याला चांगला भाव मिळत असल्याने आनंदात DJ लावून डान्स करणाऱ्या  शेतकऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. एरवी 2 ते 5 हजार रु प्रति क्विंटल असलेला आले पिकाचा भाव सध्या 12 ते 15 हजार रु प्रति क्विंटल असल्याचे सांगितले जातेय. पण यातले सत्य काय आहे? खरंच शेतकऱ्यांना एव्हढा भाव मिळतोय का? मिळतोय तर किती आणि आल्याच्या दर वाढ होण्यामागे काय आहेत कारणे पाहूया. काय आहे वस्तुस्थिती? जालना भाजी  मार्केटमध्ये आले पिकाची आवक मागील दोन दिवसापासून वाढलीय. या बाजारात शुक्रवारी 15 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव होता. रविवारपासून आवक वाढल्यानं तो दर 14 हजारापर्यंत खाली आला. तर मंगळवारी जास्तीत जास्त 12000 रुपये दर मिळाला. मागील वर्षी आले पिकाला केवळ 700 ते 800 रुपये प्रिक्विंटल भाव होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोटर फिरवून पीक नष्ट केलं.  आले काढणीचा खर्च देखील शेतकऱ्यांना परवडत नव्हता.  त्यामुळे यंदा आल्याची लागवड कमी झाली आणि त्याचा परिणाम म्हणून सध्या चांगल्या आद्रकाला 12 ते 15 हजार, मध्यम आल्याला 8 ते 10 हजार तर कमी गुणवत्तेच्या आले पिकाला 5000 रु दर मिळत असल्याचे व्यापारी जावेद खान यांनी सांगितले. तुम्ही कधी 52 जातीचे आंबे पाहिले का? कोल्हापुरात एकदा यायला लागतंय मग…, पाहा VIDEO ‘माझ्याकडे 1 एकर क्षेत्रावर 12 क्विंटल अद्रक पिकाची लागवड होती. शेतावरच मी या आल्याची विक्री केली. एका एकरात मला 110 क्विंटल आले झाले. 15 हजार रुपये दराने मी याची विक्री केली. एका एकरात माल तब्बल 16 लाखांचे उत्पन्न झाले. चांगला दर मिळत असल्याने मी समाधानी आहे. मागील वर्षी माझेच आले मी रोटर फिरवून नष्ट केलं होते. आता माझा मागील वर्षीचा खर्च देखील वसूल झालाय, अशी प्रतिक्रिया शेतकरी प्रकाश डोईफोडे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात