अंबरनाथ, 11 सप्टेंबर : 40 लाखांच्या खंडणीसाठी (Ransom) एका 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण (Kidnapped ) करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये (ambarnath) घडली होती. पण, पोलिसांनी मोठ्या शिताफीने 3 दिवसानंतर या मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा बारेलाल (krushana barelala) असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव होतं. मात्र, तीन दिवसानंतर कृष्णाची ठाणे, उल्हासनगर क्राईम ब्राँच आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने सुखरूप सुटका केली. यात अपहरण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 8 सप्टेंबरला सायंकाळी ट्युशन वरून घरी परतत असताना कृष्णाचे परशुराम रेसिडेन्सी येथून अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. Electric Vehicles च्या चार्जिंगसाठी नो टेन्शन, आता येणार मोबाईल चार्जिंग स्टेशन ‘मुलगा हवा असल्यास 40 लाख द्यावे लागतील’ अशी मागणी अपहरणकर्त्याने फोनद्वारे केली होती. त्यामुळे कृष्णाच्या आई वडिलांना मोठी काळजी लागली होती. अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र स्थानिक पोलिसांच बरोबरच ठाणे शहर पोलीस, उल्हासनगर आणि ठाणे क्राईम ब्राँच, खंडणी विरोधी पथक याचा समांतर तपास करत होते. यासाठी विविध पाच पथकं तयार करण्यात आली होती. दरम्यान याची माहिती अपहरणकर्त्यांना मिळू नये याची देखील खबरदारी पोलिसांना घ्यायची होती. कारण मुलांचं काही बरं वाईट होण्याची शक्यता होती. संतापजनक, उल्हासगरमध्ये 14 वर्षीय मुलीला मारहाण करून बलात्कार अखेर या अपहरणकर्त्याला आणि त्याच्या साथीदारांना ठाणे आणि उल्हासनगर क्राईम ब्राँचच्या पथकाने आंबिवली येथून बेड्या ठोकल्या आहेत. अपहरणकर्त्याने नियोजन बद्ध पद्धतीने कृष्णाचे अपहरण करण्यापूर्वी त्याच्याशी ओळख वाढवली, त्यानंतर त्याला चॉकलेट, मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळायला देऊन आणखी ओळख वाढवली आणि संधी मिळताच त्याचे अपहरण केले. पोलीस तपास करत असताना आरोप हा अंबरनाथच्या अपहरण करणाऱ्या ठिकाणी चार ते पाच दिवस वावरतांना सीसीटीव्हीत दिसत असल्याने त्यांनी ते फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर अपहरणकर्त्याचे फोटो बनवले, संगणक तज्ज्ञांची मदत घेतली. दरम्यान गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी सापळा रचून आंबिवली येथून अपहरणकर्ता आणि त्याचे तीन साथीदार यांना बेड्या ठोकल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक मुराळे यांनी दिली.अमजद खान, छोटू सिंग, योगेंद्र सिंग आणि सुनील लाड अशी या आरोपीची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. कशी केली चिमुरड्याची सुटका ज्या अंबरनाथच्या परशुराम रेसिडेन्सी या भागात आरोप कृष्णा ला भेटला त्यावेळचा सीसीटीव्ही आणि इतर दिवशी कृष्णासोबत मैत्री करणारे काही संशयित चेहरे सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. तर मुलगा हरविल्यानंतरही अमजद खान हा आरोपी मुलाबरोबर असल्याचे दिसल्याने पोलिसांनी अमजद खानचा शोध सुरू केला. हे तिन्ही आरोपी ज्या मिठाईच्या दुकानात काम करत होते, त्या दुकानातून त्यांचा आंबिवली( मोहने) परिसरातील पत्ता मिळवून शनिवारी(आज) दुपारी पोलिसांनी अमजदच्या राहत्या घरी धाड टाकली. त्यावेळी अमजदसह हा चिमुरडा कृष्णा त्याच्या घरात होता. पोलिसांनी अमजदला पकडल्याचे कळताच त्याचे इतर दोन साथीदार कारने इगतपुरीच्या दिशेने पळाले. त्यांनी आधीच उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसचे तिकीट बुक केले होते. मात्र, पोलिसांनी नाकाबंदी करत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. शिवाय फोनवरून धमकावणाऱ्या चौथ्या आरोपीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि 9 वर्षांच्या कृष्णाला त्याच्या पालकाकडे सुखरूप सुपूर्द केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







