मराठी बातम्या /बातम्या /पुणे /सुषमा अंधारेंनी घेतली किरीट सोमय्यांची शाळा, विचारले 4 मोठे सवाल, आता देतील का उत्तर?

सुषमा अंधारेंनी घेतली किरीट सोमय्यांची शाळा, विचारले 4 मोठे सवाल, आता देतील का उत्तर?

'ईडीविरोधात जेलभरो आंदोलनाच्या तारखा लवकरच जाहीर करू'

'ईडीविरोधात जेलभरो आंदोलनाच्या तारखा लवकरच जाहीर करू'

मग प्रताप सरनाईक यांच्यावर किरिट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचं पुढे काय झालं.

मुंबई, 12 मार्च : महाविकास आघाडीचे आमदार आणि माजी मंत्र्यांच्या मागे अजूनही ईडीचा ससेमिरा कायम आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर किरिट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचं पुढे काय झालं.. सोमय्यांनी आरोपांच्या एवढ्या प्रेस घेतल्या एवढे ट्विट्स केले त्याचं काय झालं? असा सवालच अंधारेंनी विचारला.

सुषमा अंधारे पुण्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

कालची किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद म्हणजे बिभस्तपणाचा प्रकार होता. जणू काही तेच ईडीचे प्रमुख आहे अशा थाटात ते बोलत होते. प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींना तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल पत्र लिहिलं होतं. त्यावर खरंतर मोदींनीच उत्तर देणं अपेक्षित होतं पण त्यांच्याऐवजी सोमय्या सारखे पोपटच बोलू लागले, असा टोला अंधारेंनी सोमय्यांना लगावला.

(शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार सुर्वेंचा मार्फ केलेला व्हिडीओ व्हायरल, पोलिसांत गुन्हा दाखल)

भाजप काय वॉशिंग आहे का? कारण भ्रष्टाचाराचे आरोप झालेली मंडळी तिकडे जातात स्वच्छ कशी होतात? मग प्रताप सरनाईक यांच्यावर किरिट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचं पुढे काय झालं. सोमय्यांनी आरोपांच्या एवढ्या प्रेस घेतल्या एवढे ट्विट्स केले त्याचं काय झालं? अस सवालच अंधारेंनी सोमय्यांना विचारला.

सोमय्या दापोली 11 वेळा जातात ते काय ईडीचे कर्मचारी आहेत का ? अनिल परब यांच्यावर 245 ट्विट्स केले. बरं मग आता मोदींच्या बहिणबाई बनलेल्या भावना गवळी यांच्यावरील आरोपांचं काय झालं? त्या शिंदे गटात जाताच भावना गवळी यांच्या पीएला लगेच जामीन कसा मिळतो? असा सवालही सुषमा अंधारे यांनी सोमय्या यांना केला.

सेनेत असताना भ्रष्टाचारी असलेले यशवंत जाधव तिकडे जाताच स्वच्छ कसे होतात? मग सोमय्या यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं पुढे काय झालं? मग आता सदानंद कदम आणि अनिल परब यांनी समजा स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपात जायचं ठरवलं तर तेही असेच स्वच्छ होणार का?  असा सवालच त्यांनी भाजपला विचारला.

(..त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडलं, गुलाबराव पाटलांनी मनातलं बोलून दाखवलं)

सोमय्या यांनी आत्ताच या प्रश्नांची उत्तरे द्यावी. अर्जुन खोतकर यांच्यावरही सोमय्या यांनी असेच जमीन हडपण्याचे आरोप केले होते त्याचं पुढे काय झालं? नारायण यांचेही भाजपात जाताच तेच झालं. किशोरीताई पेडणेकर यांनी ईडीकडून पाठवलेलं पत्र किरिट सोमय्या यांच्या हाती आदल्यादिवशीच कसं काय पडतं? असाही सवाल त्यांनी उपस्थितीत केलं.

ईडीचे सत्यव्रत नावाचे अधिकारी गेले नऊ वर्षे म्हणजेच 2014 पासून ते आजतागायत एकाच पदावर कसे काय राहू शकतात? या एकाच विशिष्ट अधिकाऱ्याला सलग 9 वर्षे extension नेमकं कोणत्या नियमाच्या आधारे मिळालंय? याचं उत्तर केंद्र सरकारने द्यावं, अशी मागणीही सुषमा अंधारेंनी केली.

अजय आशर नावाचा बिल्डर आणि किरीट सोमय्यांचे काय संबंध आहे? अजय आशरला थेट नीती आयोगावर नियुक्त कसं केलं? हा प्रश्नच भाजपच्यात आशिष शेलारांनी जाहिर सभेतून केला होता. त्याचं पुढे काय झालं? एकनाथ शिंदे यांचे पीए सचिन जोशी नेमकं कुठे आहेत? अजय आशर यांना सक्तीच्या रजेवर का पाठवलं गेलं? याची उत्तरं किरिट सोमय्या यांनी द्यावी, अशी मागणीच अंधारेंनी केली.

जर ईडीच्या यंञणेचा गैरवापर यापुढेही थांबला नाही तर आम्हाला ईडीविरोधात जेलभरो आंदोलन करू. प्रसंगी ईडीविरोधात कोर्टातही जाऊ. ईडीविरोधात जेलभरो आंदोलनाच्या तारखा लवकरच जाहीर करू, असंही सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं.

First published:
top videos

    Tags: ED