मुंबई, 12 मार्च : राज्याच्या राजकारणात मान शरमेनं घालणारी एक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मार्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीतला एक व्हिडीओ कुणी तरी मार्फ केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. ((..त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडलं, गुलाबराव पाटलांनी मनातलं बोलून दाखवलं) दहिसर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन शिवसैनिकांनी गोंधळ घातला. या प्रकरणी अखेर तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवला आहे.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? pic.twitter.com/rpaqbMtiZU
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 11, 2023
‘खुन्नशी विचार कसा असतो. मी माझं करिअर पणाला लावलं आहे. मी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे मला अडकवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. अडकवता येत नसल्यामुळे आता चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहे. खरंतर इतक्या खालच्या पातळीचे विचार कुणी करू शकतं, एखादी स्त्री जी कुणाची आई आहे, बहिण, सून आणि बायको आहे, तिच्याबद्दल असा व्हिडीओ टाकणे हे महिला म्हणून मनाला वेदनादेणारे आहे, अशी प्रतिक्रिया म्हात्रेंनी दिली. (‘माझ्या घरातून बाहेर काढलं’, धनुभाऊंचा पंकजा मुंडेंवर भावनिक वार) विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जातील, असं वाटलं नव्हतं. शिवरायांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला असं बदनाम करू शकता. हे कुणी केलं आहे, ते सगळ्यांना माहिती आहे, मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? असा सवालही म्हात्रेंनी केला.