हिमाचल प्रदेश 26 जुलै : मरण कधी आणि कसे येईल हे कधीच माणसाला कळत नाही. अक्षरशः काही वेळापूर्वी जिवंत असलेली व्यक्ती मरण पावलेली असते. त्या व्यक्तीलाही कल्पना नसते की काहीच क्षणांनी आपण हे जग सोडून जाणार आहोत. आयुष्य किती क्षणभंगुर आहे याचीच प्रचिती जयपूरमधील डॉक्टर दीपा शर्मा (Dr. Deepa Sharma) यांच्या दुर्दैवी मृत्यूनं आली आहे. एका उमद्या डॉक्टरच्या अशा दुर्दैवी शोकांतिकेनं सगळयांनाच हुरहूर लावली आहे. रविवारी किन्नौर जिल्ह्यात (Kinnaur) झालेल्या भूस्खलनात नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला. यात 34 वर्षीय डॉक्टर दीपा शर्मा यांचा समावेश होता. या भीषण अपघाताच्या अवघे काही तास आधी त्यांनी आपल्या हिमाचल सहलीतील एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. ट्विटरवर ही आपली शेवटची पोस्ट असेल याची काडीमात्र कल्पना शर्मा यांना नव्हती. भारताच्या तिबेट**(Indo-Tibet Border)** लगतच्या सीमेवरील शेवटच्या ठिकाणी असलेल्या नागस्ती पॉइंट चेक-पोस्टजवळ उभ्या राहून त्यांनी स्वतःचा फोटो काढला होता आणि तो ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी एक पोस्टदेखील शेअर केली होती. ‘इंडो तिबेट सीमा पोलीस दल. भारताच्या शेवटच्या टप्प्यावर जिथंपर्यंत नागरिकांना जाण्याची परवानगी आहे. तिथं मी उभी आहे. या पॉइंटच्या पलीकडे जवळपास 80 किलोमीटरवर तिबेटची सीमा आहे. ज्यावर चीननं बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.’ असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं. 8 वर्षांआधी मृत्यू झालेल्या गर्लफ्रेंडसोबत आजही बोलतो हा व्यक्ती; कसं झालं शक्य? ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच सांगला खोऱ्यात भूस्खलन (Landslide) होऊन झालेल्या अपघातात मरण पावलेल्या पर्यटकांमध्ये शर्मा यांचा समावेश असल्याचं ट्विटरवरील लोकांना समजलं. ट्विटरवर डॉक्टर शर्मा यांच्या पोस्ट वाचणाऱ्या लोकांना हा मोठा धक्का होता. शर्मा यांच्या भावानं ट्विटरवर त्यांच्या अपघाती निधनाची बातमी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टेम्पो ट्रॅव्हलरवर भलेमोठे दगड कोसळल्यानं त्यातून प्रवास करणारे नऊ पर्यटक ठार झाले तर दोन लोक जखमी झाले. मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये जयपूरच्या डॉ. दीपा शर्मा यांचा समावेश आहे.
Standing at the last point of India where civilians are allowed. Beyond this point around 80 kms ahead we have border with Tibet whom china has occupied illegally. pic.twitter.com/lQX6Ma41mG
— Dr.Deepa Sharma (@deepadoc) July 25, 2021
Dil toh baccha hain! लग्नातच नवरीची मस्ती; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं डॉक्टर दीपा शर्मा या अतिशय उत्साही, निसर्गप्रेमी आणि पर्यटन प्रिय व्यक्ती असल्याचं त्यांच्या पोस्ट्सवरून सहज कळून येतं. गेल्या काही दिवसांतील त्यांचे ट्विटर फीड बघितले तर ते त्यांच्या हिमाचल (Himachal Pradesh) सहलीतील निसर्गरम्य फोटोनी भरलेले होतं. निसर्गाशिवाय हे आयुष्य अपूर्ण आहे, तसंच आजची सकाळ अशी छान गेली असे काही ट्विट्स त्यांनी या फोटोसह शेअर केले होते. निसर्गाच्या सहवासात उत्फुल्लतेनं खुललेल्या दीपा यांचे अनेक फोटो त्यांचं निसर्गाविषयीचं प्रेम, आयुष्यातील उत्साह स्पष्ट करतात. अशा या उत्साही, दिलखुलास तरुण डॉक्टरचा असा मृत्यू व्हावा याचं सर्वांनाच प्रचंड दुःख झालं असून, ट्विटरवर अनेकांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद(President Ramnath Kovind) यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मदत निधीकडून या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीनं मला खूप दु:ख झालं असून, मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे,’ अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.