मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Weather Forecast: आज पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता; कशी असेल कोकणातील स्थिती?

Weather Forecast: आज पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता; कशी असेल कोकणातील स्थिती?

Weather Forecast: आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला असला, तरी धोका कायम आहे. आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.

Weather Forecast: आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला असला, तरी धोका कायम आहे. आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.

Weather Forecast: आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला असला, तरी धोका कायम आहे. आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.

पुणे, 24 जुलै: बुधवारी मध्यरात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात (Konkan) पावसानं अक्षरशः थैमान (Heavy Rainfall) घातलं आहे. कमी वेळेत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तर पंचगंगा, वाशिष्ठी आणि कृष्णा नदीनं तर धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. त्यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून पुरजन्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असलं तरी मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी पुराच्या पाण्याच्या पातळीतही घट झाली आहे.

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धोका कायम आहे. आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील आणखी चोवीस तास कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धोका कायम आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाशी शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा धोका देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा-Mumbai Goa Highway: वाशिष्ठी नदीवरचा ब्रिटीश कालीन पूल खचला, पाहा PHOTOS

उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीअंशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार पाच दिवसांत रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पुरस्थिती नियंत्रणांत येऊ शकते. मागील तीन दिवसांपासून कोसळलेल्या पावसानं कोल्हापूर, सांगली, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पीक वाहून गेली आहेत. तर काहींची जनावरं देखील पाण्यात अडकून पडली आहेत.

हेही वाचा-VIDEO : कोल्हापुरातील शेकडो गावांना महापुराचा फटका; महामार्गावर 6 फूट पाणी

याशिवाय रायगड जिल्ह्यातील महाड जवळ असलेल्या तळीये गावातील दरड कोसळून मोठा अपघात घडला आहे. गावातील 35 घरांवर दरड कोसळल्यानं अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घटनास्थळाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.

First published:

Tags: Pune rain, Weather forecast