वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अतिवृष्टीमुळे अशा अवस्थेत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हा पूल आहे. बहादूर शेख नाका इथे असलेल्या पुलाच्या मधला काही भाग वाहून गेला. हा पूल खचल्यामुळे मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाला जोडणारा भराव वाहून गेल्यामुळे पूल वाहतुकीस बंद राहणार आहे. पाणी ओसरल्यावर या मार्गावरील वाहतूक चिपळूण बायपास, वालोपे अशी सुरू होईल.