ब्लॅड प्रशेरच्या त्रासाला कंटाळून पतीनं पत्नीवर झाडली गोळी, मग हातात घेतली बंदूक आणि...

ब्लॅड प्रशेरच्या त्रासाला कंटाळून पतीनं पत्नीवर झाडली गोळी, मग हातात घेतली बंदूक आणि...

मृतदेहा शेजारी एक लायसन्स रायफल होती. या बंदुकीनं गोळ्या जाडून जोडप्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

  • Share this:

कानपूर, 07 जुलै : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कानपूरच्या देहात येथे एका खोलीत संशयास्पद परिस्थितीत पती-पत्नीचा मृतदेह आढळला. दरम्यान मृतदेहा शेजारी एक लायसन्स रायफल होती. या बंदुकीनं गोळ्या जाडून जोडप्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी उच्च रक्तदाबाची रुग्ण होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. असे मानले जात आहे की, पतीनं गोळी झाडून आधी पत्नीला मारलं, त्यानंतर स्वत: जीव घेतला आणि आयुष्य संपवले. शेजाऱ्यांनी गोळ्यांचा आवाज ऐकून, या जोडप्याचे घर गाठले. त्यानंतर दोघांना मृत अवस्थेत पाहून लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

वाचा-महिलांमध्ये 10 रुपयांच्या ‘भेळ’साठी भांडण, नंतर घरात घडला धक्कादायक प्रकार

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या जोडप्याचे शव पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अद्याप कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना सापडलेली नाही आहे.

वाचा-Lockdown असतांनाच भाजपच्या आमदाराची दारु पार्टी, केली मौज; पाहा VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना, मृत जोडप्याचे नाव धनंजय सिंह आणि सुधा सिंह आहे. पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक चौकशी करत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जाईल.

वाचा-लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल

संपादन-प्रियांका गावडे.

Published by: Manoj Khandekar
First published: July 7, 2020, 10:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या