रायचंद शिंदे (पुणे) : एका शेतकऱ्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो बैलाला जुंपत असताना त्याच्यावर बैलाने जिवघेणा हल्ला केला आहे. बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान एका बैलाने आपल्या मालकाच्या पोटात लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. बैल हा शेतकऱ्यांचा सोबती मानला जातो मात्र याच बैलाच्या मनाविरुद्ध काही तरी होत असल्यास बैलाला राग अनावर होऊन बैलाने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान एका बैलाने आपल्या मालकाच्या पोटात लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. बैल हा शेतकऱ्यांचा सोबती मानला जातो मात्र याच बैलाच्या मनाविरुद्ध काही तरी होत असल्यास बैलाला राग अनावर होऊन बैलाने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : Viral Video : रस्त्यावर कार उलटी धावताना पाहून नागरिकांना बसला धक्का
#जुन्नर - बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान एका बैलाने आपल्या मालकाच्या पोटात लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/nXKhjpyKUB
— News18Lokmat (@News18lokmat) December 31, 2022
यात मोठी दुर्घटना घडली असती मात्र मालक यातून बचावला आहे. बैलगाड्याच्या घाटात बैलाला जुंपत असताना बैलाने थेट मालकाच्या पोटातच लाथ घातलीय यावेळी हा मालक थेट जमिनीवरच पडला आहे. यावेळी मालकाने काहीच न झाल्याचं दाखवत पुन्हा उभा राहिला.
औरंगाबादमध्येही व्हायरल व्हिडिओची चर्चा
औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी भर चौकात खून झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान सर्वत्र 31 डिसेंबरच्या तयारीसाठी बंदोबस्त असतानाही एका रिक्षा चालकाने भर चौकात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान रिक्षावाल्याचा धुमाकूळ पाहून पोलीसही हैराण झाले होते. या घटनेची औरंगाबाद शहरात जोरदार चर्चा रंगली होती.
औरंगाबाद शहरात थर्टी फर्स्टच्या अगोदरच दारू पिऊन रिक्षा चालकाने धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान रिक्षा चालक दारू पिऊन एवढा फुल्ल होता की, रिक्षा रोडवरच उभी करून रिक्षाच्या खाली जोरात पडला. ही घटना औरंगाबादमधील पुंडलिक नगर भागातील आहे.
हे ही वाचा : महाकाय गेंडा पर्यटकांच्या मागे धावत सुटला, श्वास रोखून धरायला लावणारा Video
रिक्षा चालकाला रिक्षा आवरत नसल्याने एका भरलेल्या रिक्षालाही उडवले होते. रिक्षावाल्याचा धुमाकूळ पाहून पोलीसही हैराण झाले होते. या घटनेमुळे काही वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.