नवी दिल्ली, 29 डिसेंबर : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल काही सांगता येत नाही. आपण कल्पनाही करणार नाही, अशा काही गोष्टी सोशल मीडियावर आपल्या समोर येतात. असाच एका कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार धुमाकूळ घालत आहे. तो व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. असं काही होऊ शकते यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. या व्हिडिओमध्ये कार सरळ चालण्याऐवजी उलटी चालत आहे. मुळात कारचं डिझाइनच तसं बनवलेलं आहे. त्यामुळे पाहणाऱ्यांचा गोंधळ उडतोय. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ अनेकदा पाहण्याचा मोह आवरता येत नाहीये. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. तुम्ही अनेक प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये पाहिल्या असतील. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या गाड्या तर आपण पाहतोच. अलीकडेच मार्केटमध्ये आलेल्या इलेक्ट्रिक गाड्याही तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील. त्याचबरोबर हवेत उडणाऱ्या गाड्यादेखील आता मार्केटमध्ये येत आहेत; पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जशी गाडी आहे तशी तुम्ही कुठेच पाहिली नसेल. ही उलटी चालणारी गाडी म्हणूनच लोकांचं आकर्षण बनली आहे. व्हिडिओतली कार उलटी चालत आहे, म्हणजेच तिचे टायर्स वर आहेत आणि टप खाली आहे, असंच वाटतं; पण त्या कारचं डिझाइनच त्या प्रकारे बनवण्यात आलेलं आहे. हे डिझाइन युनिक असल्याने नेटकरी ते पाहण्यासाठी व्हिडिओवर अक्षरशः तुटून पडत आहेत. हा व्हिडिओ @BornAKang नामक ट्विटर हॅंडलवरून शेअर केला गेलेला आहे. हा व्हिडिओ फक्त 7 सेकंदांचा आहे; मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका दिवसापूर्वी शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओला जवळपास 3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.1.5 लाखाहून अधिक लाइक्स व्हिडिओला मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणावर शेअरही केला जात आहे.
या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. एका युझरने आपली प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे, की “या व्हिडिओने माझा गोंधळ उडाला आहे.” अन्य एका युझरने लिहिलं आहे, की “मी हा व्हिडिओ अनेकदा पाहिला आहे. काय डिझाइन आहे!” आणखी एका युझरने लिहिलं आहे," ही काय नवी करामत आहे." एकंदरीत या उलट्या गाडीचं डिझाइन पाहून सर्वांनाच प्रश्न पडला आहे. Nashik : जॅक्सनच्या वधासाठी वापरलेलं पिस्तूल पाहण्याची नाशिककरांना संधी, Video अशा प्रकारे अनेक अविश्वसनीय गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर पहायला मिळतात. अनेक गोष्टी तर कल्पनेच्या बाहेरच्या असतात. अनेकदा या गोष्टी खोट्या वाटतात; पण या जगात करामती लोकांची काही कमी नाही व अशी करामती माणसं काय करतील त्याचा अंदाज लावणं कठीण आहे.