पुणे, 22 फेब्रुवारी : पुण्यात मनसे (MNS) आक्रमक झाली असून येथील एका प्रसिद्ध कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कामगार विरोधी धोरणामुळे मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे यांनी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयाची केली तोडफोड केली, अशी माहिती समोर आली आहे.
मनसेचे 4 ते 5 कार्यकर्त्यांनी कंपनीचं प्रवेशद्वार लाठ्यांनी तोडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. बेकायदेशीररित्या कामगारांना कामावरून कमी करणे, कामगारांना पगार वाढणार न करणे, कामगारांवर अन्याय करणे, संघटनेला चर्चेला वेळ न देणे, संघटनेचा नाम फलक लावण्यास विरोध करणे यामुळे कंपनीच्या कार्यालयाती तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विमाननगर भागातील कंपनीत मनसेकडून तोडफोड करण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरससाठी प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) ही महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिजैविकं असणं गरजेचं आहे. तर त्याला हर्ड इंम्युनिटी तयार झाली असं म्हणता येईल. ते पुढे म्हणाले की, 'या नव्या व्हेरिएंटमुळे अँटी बॉडी विकसित झालेल्या लोकांमध्ये पुन्हा संसर्ग होऊ शकतो.' त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये जर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तर समजायचं की कोरोनाच्या या नव्या उपप्रकाराची लागण झाली आहे.