मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा देऊळ बंद! शेगावबरोबरच पंढरपूर देवस्थानाचा निर्णय

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा देऊळ बंद! शेगावबरोबरच पंढरपूर देवस्थानाचा निर्णय

माघी यात्रेसाठी पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक परतले आहेत.

माघी यात्रेसाठी पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक परतले आहेत.

माघी यात्रेसाठी पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक परतले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

पंढरपूर, 22 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 14 हजार रुग्ण सापडले असून त्यापैकी 7 हजारांहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात बंदोबस्त कडक केला आहे. राज्यातील अनेक मंदिरंदेखील बंद करण्यात येत आहेत. पंढरपूरचे मंदिर आज आणि उद्या असे 48 तास बंद असल्याची माहिती समोर आली आहे. (Temple closed again due to corona outbreak )

माघी यात्रेपुर्वीच वारकऱ्यांनी पंढरपुरातील मठामध्ये मुक्काम केला होता. मात्र पोलीस प्रशासाने मठात वारकऱ्यांना मुक्काम करू दिल्यास मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस पाठविल्या आहेत. पोलिसांनी मठांची तपासणी करताच 34 ते 40 हजार भाविक आपल्या गावी यात्रेपुर्वीच परतले आहेत. यामुळे माघी यात्रेपुर्वीच पंढरपूर रिकामे होताना दिसत आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चार पथके तयार केली आहेत. या पथकांनी शनिवारी व रविवारी 257 मठांची तपासणी केली आहे. यामध्ये शहरातील 137 मठ तर ग्रामीण भागातील 120 मठांची तपासणी केली आहे. या तपासणी दरम्यान शनिवारी मठामध्ये भाविकांची संख्या होती. मात्र रविवारी मठांची तपासणी केल्यानंतर मठातील उतरलेल्या भाविकांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर मठामध्ये अचानक भेट देण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहेत. यामुळे मठातील भाविक आपल्या गावाकडे परतण्यावर भर देत आहेत.

हे ही वाचा-महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन; Covid-19 अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक

पंढरपूर हद्दीवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरात येणाऱ्या वाहनधारकांचे नाव , मोबाइल नंबर घेऊन पुढे सोडले जात आहे. तसेच मास्कची देखील तपासणी केली जात आहे. (Temple closed again due to corona outbreak ) भाविकांनी शहरात प्रवेश करू नये, मुक्काम करू नये व सद्यस्थिती मध्ये पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून मास्क वाटप केले जात असून यासाठी त्यांचे प्रबोधन देखील केले जात आहे. माघ यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 257 मठांची तपासणी केली आहे. तर तालुक्यात 28 ठिकाणी तर शहरात 8 ठिकाणी नाकाबंदी केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांनी दिली.

दुसरीकडे शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid19, India, Maharashtra, Pandharpur