जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : पुणेकरांमध्ये टोळक्याची दहशत, पुन्हा वाहनांची तोडफोड; घरावरही दगडफेक

Pune News : पुणेकरांमध्ये टोळक्याची दहशत, पुन्हा वाहनांची तोडफोड; घरावरही दगडफेक

पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड

पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड

पुण्यामध्ये टोळक्याचा धूडगूस सुरूच आहे. पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 27 जून : पुण्यामध्ये टोळक्याचा धूडगूस सुरूच आहे. पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत वाहन मालकांचं मोठं नुकसान झालं आहे. शहरातील अरण्येश्वर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांंचं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर टोळक्याकडून घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. अरण्येश्वर भागात तोडफोड  पुण्याच्या अरण्येश्वर भागात ही घटना घडली आहे. हा परिसर सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. आठ दिवसांपूर्वी देखील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडल्यामुळे या टोळक्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशानं टोळक्याकडून ही तोडफोड करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

Darshana Pawar Murder Case : कटरने गळा चिरला, मग दगडाने डोकं ठेचलं अन्..; राहुलने दर्शनाला निर्दयीपणे संपवलं

नागरिकांमध्ये दहशत  दरम्यान घराबाहेर लावण्यात आलेल्या वाहानांची टोळक्याकडून तोडफोड करण्यात येत असल्यानं या घटनेनं नागरिकांमध्ये दहशत निर्माण  झाली आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. याचा मोठा फटका हा वाहन मालकांना बसत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या टोळक्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात